शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार रणदुल्लाबाद गाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:33 IST

आदिलशहाचा सरदार असलेल्या अफजलखानाने स्वराज्यावर केलेल्या आक्रमणाच्यावेळी हे गाव अस्तित्वात नव्हते. स्वराज्य रक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अफजलखानाच्या सैन्याचा या ...

आदिलशहाचा सरदार असलेल्या अफजलखानाने स्वराज्यावर केलेल्या आक्रमणाच्यावेळी हे गाव अस्तित्वात नव्हते. स्वराज्य रक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अफजलखानाच्या सैन्याचा या ठिकाणी सामना केला. त्यावेळी माहूर तालुका पुरंदर येथील जगताप बंधू वाईचे पिसाळ देशमुख या मराठा दिले शिलेदारांवर शिवाजी महाराजांनी जबाबदारी दिली होती.

लढाईनंतर जगताप पिसाळ देशमुख यांनी या ठिकाणी वास्तव्य केले. यातूनच रणदुल्लाबाद गाव वसले. या गावात जगताप यांची घरे अधिक आहेत. छत्रपतींचा समूळ नायनाट करण्यासाठी आदिलशाहीने अफजलखानावर मोठी जबाबदारी दिली होती. अफजल खानाबरोबर रणदुल्लाखान हा दुसरा सरदारही या मोहिमेत सहभागी होता. मात्र तो शिवाजी महाराज समर्थक म्हणून ओळखला जात होता. आदिलशहाच्या दरबारात छत्रपती शिवाजी राजे यांच्या बरोबर रणदुल्लाखान होता.

या दोघांमधील मैत्री आदिलशाहीसाठी डोकेदुखी होती, त्यामुळे रणदुल्लाखान या मोहिमेविषयी नाराज होते. हरेश्वर डोंगर रांगेजवळच्या जागेत खानाची छावणी पडली होती. त्यावेळी ज्या छावणीत जगताप देशमुख या राजांच्या सैन्यात युद्ध झाले होते, त्या ठिकाणी अफजलखानाने त्यांच्यावर विषप्रयोग करून रणदुल्लाखानला संपवूनत्याची कबर बांधली. त्यानंतर अफजलखानाने पुढे वाईच्या दिशेने प्रयाण केले. मात्र माहूरचे जगताप आणि वाईचे पिसाळ देशमुख यांनी येथेच वास्तव्य केले.

हिंदू-मुस्लीम ऐक्य

रणदुल्लाखान यांच्या कबरीमुळे या गावाला रणदुल्लाबाद नाव पडले असल्याचे गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात. रणदुल्लाबाद येथे एकच मुस्लिम कुटुंब राहते मात्र गावाचा धार्मिक सलोखा निश्चितपणे वाखाणण्याजोगे आहे. गावात हिंदू मुस्लिम ऐक्य असून मोहरम आणि ईद साजरी केली जाते.