शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

निरोपाच्या अन् स्वागताच्या तोफा धडाडूनही राजेंचे मौन!

By admin | Updated: January 15, 2017 00:58 IST

कोणतेच भाष्य नाही : जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार खलबतं

सातारा : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार खलबते सुरू आहेत. या खलबतांच्या केंद्रस्थानी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आहेत. अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात महारथी नेत्यांनी उदयनराजेंविरोधात रान उठवले. तर दुसऱ्याच दिवशी भाजपचे मातब्बर नेते महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उदयनराजेंना पक्षात घ्यायला उत्सुकता दर्शवली. निरोपाच्या अन् स्वागताच्या तोफा धडाडत असूनही उदयनराजेंनी मात्र मौन बाळगले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीविरोधात भूमिका घेतल्याने पक्षाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागल्याची सल जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे नुकतीच व्यक्त केली होती. शरद पवारांनी देखील शेखर गोरे यांचा पराभव जिव्हारी लागल्याचे स्पष्ट करत ज्यांना राष्ट्रवादीने निवडून आणले ते कार्यकर्ते पक्षाविरोधात काम करत असतील तर त्यांना बाजूला करण्याचे निर्देश दिले. दुसऱ्याच दिवशी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे भाजपमध्ये स्वागतच केले जाईल, असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत, तसेच आम्ही त्यांना मुजरा करतो, असे म्हणत उदयनराजेंना भाजपमध्ये घेण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलून दाखविले होते. स्वपक्षाचे नेतेमंडळी जाहीरपणे विरोधात भूमिका घेत असताना खासदार उदयनराजेंनी मात्र मौन बाळगले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सातारा तालुक्यात दोन्ही राजेंचे कार्यकर्ते स्वतंत्रपणे लढायची तयारी करत आहेत. काही ठिकाणी तर बाह्या वर करून एकमेकांची जिरवण्यासाठी सज्ज आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपही उदयनराजेंना आपल्याकडे खेचून बळ वाढविण्यासाठी तयारीत दिसते. या घडामोडी वेगाने घडत असताना उदयनराजेंकडून काहीच हालचाली नसल्याने कोंडी कायम राहिली आहे. (प्रतिनिधी) पत्रकयुद्ध का थांबले?जलमंदिर व सुरुची या दोन वाड्यांवरून एकमेकांविरोधातील पत्रकांची सरबत्ती थांबली आहे. वास्तविक, काही दिवसांपूर्वी विरोधात शब्द निघाला तरी दोन्ही वाड्यांवरून पत्रके प्रसिद्धीसाठी पाठविली जात होती. हे पत्रकयुद्ध माध्यमांतून बरेच गाजले होते. हे युद्ध अचानकपणे कसे थांबले?, असा सवाल साताऱ्यातील जनतेला पडला आहे.