शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शेती उद्ध्वस्त करणारा पाऊस ‘शासनासाठी अदृश्य’

By admin | Updated: August 24, 2014 22:37 IST

नुकसानीची पाहणी करूनही पंचनामा नाही : पर्जन्यमापकात पावसाचा थेंबही नाही मग भरपाई कसली म्हणे !

परळी : ढगफुटी होऊ दे नाहीतर आभाळ कोसळू दे पर्जन्यमापकात पावसाची नोंद असेल तरच भरपाई मिळेल, ही पद्धत आहे प्रशासकीय कर्मचाऱ्यांची. या कार्यपद्धतीचा फटका परळी खोऱ्यातील काही गावांना बसला आहे.परळी खोऱ्यातील काळोशी, कुरुण, करंजे तर्फ परळी या तीन गावांच्या शेजारील यवतेश्वरच्या डोंगरपट्ट्यातील सात किलोमीटरच्या अंतरात शनिवारी चार वाजता अचानक प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. यामुळे घरांची पडझड झाली. तसेच भातशेती, शेतीचे बांध वाहून गेले. पूल पाण्याखाली गेले. रस्ते खचले, नदी, नाले तुडुंब वाहिले. सुमारे एक तास जलतांडव सुरू होते. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. संसार उघड्यावर पडले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. मात्र, त्यांनी नुकसानीचे पंचनामे काही केले नाहीत. भोळ्याभाबड्या लोकांनी भरपाई मिळणार ना, असे विचारताच एका शासकीय कर्मचाऱ्याने दिलेले उत्तर ऐकून जलतांडवाची शिकार झालेल्या ग्रामस्थांच्या पायाखालची जमीनच सरकली.पर्जन्यमापकात पावसाची नोंद किती झाली आहे, यावरच भरपाई मिळणार की नाही, हे ठरणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. पण ज्या भागात पाऊस झाला त्याठिकाणाहून सुमारे १७ किलोमीटर अंतरावरील करंडी गावात पर्जन्यमापक आहे. त्याठिकाणी पाऊसच पडला नसल्याने पर्जन्यमापकात शून्य अशी नोंद झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष मुसळधार पावसाने या गावांमध्ये मोठी हानी झाली असल्याचे दिसत असतानाही शासकीय कर्मचारी मात्र घटनास्थळापासून सतरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्जन्यमापकाच्या भरवशावर का विसंबून आहेत, याचे आकलन मात्र नुकसानग्रस्तांना होत नाही. (वार्ताहर)