शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

कऱ्हाडला शनिवार पेठेतील घरांमध्ये पावसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:26 IST

कऱ्हाड : शहरात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर शनिवार पेठ येथील पी. डी. पाटील उद्यान परिसरात पावसाळी वाहिन्या, नाले ...

कऱ्हाड : शहरात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर शनिवार पेठ येथील पी. डी. पाटील उद्यान परिसरात पावसाळी वाहिन्या, नाले तुंबून भरले. यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. पावसाळी वाहिन्या, नाल्यांची योग्यप्रकारे सफाई न झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. यावर तत्काळ उपाययोजना व्हाव्यात, यासाठी येथील नागरिकांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निवेदन दिले आहे.

पावसाळा सुरू होताच शहरातील पी. डी. पाटील उद्यान व यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह परिसरात ठिकठिकाणी नाले तुंबण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. शहरात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाल्यानंतर येथील कॉलनीतील अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. काही घरांमध्ये गुडघ्याइतके पाणी भरले होते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

अनेकांना रात्रभर घरात घुसलेले पाणी उपसावे लागले. मलमिश्रीत पाणी असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. या परिसरात तीन रुग्णालये आहेत. येथेही रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या भागात नालेसफाई आणि पावसाळी वाहिन्यांच्या स्वच्छतेची कामे व्यवस्थित झाली नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहाच्या समोरील बाजूला प्लॉट नंबर ४६३ व ४६४मधील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे तारांबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. मलकापूर हद्दीतून बैल बाजार परिसरात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह परिसराकडे येत आहे. नगरपालिका प्रशासनाने यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे.