शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

‘पर्ल्स’च्या विरोधात तक्रारींचा ‘पाऊस’

By admin | Updated: November 12, 2014 23:20 IST

गुंतवणूकदारांची पाचावर धारण : दिवसभरात ७२ तक्रारी दाखल

सातारा : ‘पर्ल्स’ने गंडविलेल्या ठेवीदारांच्या तक्रारदारांचा ओघ वाढतच असून, दररोज आता येथे तक्रारीचा पाऊस पडू लागला आहे. गेल्या चार दिवसांत येथे जवळपास ५७२ ठेवीदारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. बुधवारी ७२ तक्रारी दाखल झाल्याची माहिती तक्रार लिहून घेणारे गणेश पाटणे यांनी दिली.‘पर्ल्स’ कंपनीने साताऱ्यातील सात हजारांहून अधिक ठेवीदारांच्या शेकडो कोटींंच्या ठेवी लाटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच गेल्या वर्षभरात अनेक एजंटांनी ठेवीदारांची रक्कम कंपनीमध्ये जमा केली नसल्याचे उघड झाले आहे. चार-पाच हजारांहून अधिक ठेवीदारांच्या ठेवीची मुदत संपल्यामुळे ते आता एजंटांच्या शोधात आहेत. काही ठिकाणच्या एजंटांनी पळ काढला असून, त्यांचा थांगपत्ता लागत नाही.‘पर्ल्स’बाबत ‘लोकमत’ने वस्तुस्थिती मांडल्यानंतर सात हजार ठेवीदारांचे धाबे दणाणले. त्यातच सातारा कार्यालयाच्या अखत्यारित बारामती तसेच अन्य जिल्ह्यांतील ठेवीदारांची रक्कम येत असल्यामुळे त्यांच्याही फेऱ्या वाढल्या आहेत. पर्ल्सने गंडविलेल्या रकमेचा आकडा मोठा असल्यामुळे आणि ठेवीदारांची आयुष्यभराची पुंजी यामध्ये अडकल्यामुळे अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, तात्या सावंत, सर्जेराव पाटील, मिलिंद कासार, चाँदगणी आत्तार आणि सहकाऱ्यांनी ‘पर्ल्स ठेवीदार बचाव कृती समिती’ स्थापन केली असून, त्यांच्याकडे चार दिवसांत ५७२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. (प्रतिनिधी)