शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST

सातारा: शहर पोलिसांनी शुक्रवारी सेव्हन स्टार इमारत, गुरुवार परज आणि कोडोली कमानीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या ...

सातारा: शहर पोलिसांनी शुक्रवारी सेव्हन स्टार इमारत, गुरुवार परज आणि कोडोली कमानीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत रोकड तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी चौघांना अटक केली आहे.

मनीष शर्मा, शरद साळुंखे, अस्लम मुल्ला, विकास काकडे, पांडुरंग शिंदे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, या तीनही जुगार अड्ड्यावरील कारवाईत यासिन शेख याच्यावर तीन गुन्हे दाखल झाले असून तो फरारी झाला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनीच गुन्हे दाखल केले आहेत.

सातारा येथील सेव्हन स्टार इमारतीच्या पाठीमागील आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी मनीष राजकिशोर शर्मा (वय ३७, रा. सय्यद कॉलनी, करंजे पेठ, सातारा) आणि यासिन इकबाल शेख (रा. शनिवार पेठ, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मनीष शर्मा याला अटक केली असून यासिन शेख फरार झाल्याची माहिती सातारा शहर पोलिसांनी दिली. या कारवाईत पोलिसांनी ९५० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.

गुरवार परजावर एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी धाड टाकून दोघांना अटक केली. शरद शामराव साळुंखे (वय ५४, रा. साई कॉलनी, शाहूनगर, गोडोली, सातारा), अस्लम ईस्माईल मुल्ला (वय ५२, नालबंदवाडा, गुरुवार परज, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. ४ मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली. दरम्यान, ही कारवाई सुरू असताना यासिन शेख (रा. शनिवार पेठ, सातारा) हा फरार झाला. पोलिसांनी या कारवाईत ११३० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

कोडोली ग्रामपंचायतीच्या कमानीसमोर असलेल्या एका फळाच्या गाड्याच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांवर गुन्हा दाखल केला. विकास रवी काकडे (वय ५९, रा. तुकारामनगर, अमरलक्ष्मी, ता. सातारा), पांडुरंग रवींद्र शिंदे (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, कोडोली, सातारा), यासीन इकबाल शेख (रा. ४७६, शनिवार पेठ, सातारा), सलीम हसन मुलाणी (रा. कोडोली कमानीशेजारी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापैकी विकास आणि पांडुरंग या दोघांना दि. ४ मे रोजी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.