शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

भिलवडीसह चार गावांत छापे

By admin | Updated: January 8, 2017 23:46 IST

संशयितांची धरपकड : शंभरजण ताब्यात; मुलीच्या खूनप्रकरणी तपास गतीने

सांगली/भिलवडी : माळवाडी (ता. पलूस) येथे १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रविवारी दिवसभर भिलवडी, माळवाडी, भिलवडी स्टेशन व खंडोबाचीवाडीत छापे टाकले. शंभर संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पण रात्री उशिरापर्यंत कोणतीही ठोस माहिती हाती लागली नव्हती.माळवाडीतील मुलीचा चार दिवसांपूर्वी अत्याचार करून खून केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेचा जिल्ह्यात विविध ठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे. गावे बंद ठेवली जात आहेत. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे तपासासाठी माळवाडीत तळ ठोकून आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण व गुंडाविरोधी पथकानेही या तपासात उडी घेतली आहे. सध्या चार संशयित ताब्यात आहेत; मात्र त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती पुढे आलेली नाही. हे चौघे मृत मुलीची छेड काढत होते. मुलीच्या चुलत भावाने त्यांना समजही दिलीतपासात विविध मुद्दे निर्माण करुन त्यांची चौकशी केली जात आहे. रविवारी दिवसभर पोलिसांनी भिलवडी, माळवाडी, भिलवडी स्टेशन, खंडोबाचीवाडी या गावात छापे टाकले. शंभरभर संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्रत्येक संशयिताचे नाव, त्याचा मोबाईल क्रमांक, घटनेदिवशी तो कुठे होता? याची माहिती घेतली जात आहे. पीडित मुलगी गुरुवारी रात्री घरातून बाहेर पडल्यानंतर तिला कोणी पाहिले होते का? तिच्यासोबत आणखी कोण होते का? याची माहिती घेतली जात आहे. चौकशीतून जी काही माहिती मिळेल, त्याआधारे तपासाला दिशा दिली जात आहे. मात्र अजूनही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागले नाही. परंतु याचा छडा लाऊन संशयितांना अटक करण्यात यश येईल, असे पोलिस सांगत आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद, निषेधघटनेच्या निषेधार्थ रविवारी तासगाव, डफळापूर (ता. जत), नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला, तर कुपवाड येथे संशयितांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.उद्या जिल्हा ‘बंद’चे आवाहन : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने उद्या, मंगळवारी जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. अत्यावश्यक सुविधा वगळून अन्य सर्व घटकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. खटला जलदगती न्यायालयात : रहाटकर माळवाडी येथे १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा अमानुषपणे खून केल्याची घटना गंभीर व निंदनीय आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल, अशी माहिती विजया रहाटकर यांनी रविवारी सांगलीत दिली.