शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाचगणीतील अंधाराला कंटाळून पर्यटकांनी ठोकला रामराम !

By admin | Updated: June 26, 2015 22:00 IST

जोरदार पाऊस : चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित

पाचगणी : गेल्या चार दिवसांपासून येथील वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिक व पर्यटकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. नागरिकांसह पर्यटकांना अंधाराचा सामना करावा लागला. तसेच येथे आलेले अनेक पर्यटक पाचगणी सोडून गेले. पाचगणी व महाबळेश्वर ही जागतिक पर्यटन स्थळे असून, या ठिकाणी पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी अनेक हौशी पर्यटक येतात. पाचगणीत गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे तोडणे आणि तारांवर लटकणाऱ्या फांद्या छाटण्याचे काम वीज वितरणकडून केले जाते; परंतु गेल्या दोन वर्षांपासून या कामाकडे कोणीच लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. परिणामी वादळी वाऱ्याने विद्युतवाहिन्यांवर फांद्या पडून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. आजही कित्येक ठिकाणी विजेच्या तारांवर धोकायदायकरीत्या लटकत असलेल्या फांद्या दिसत आहेत. कित्येक ठिकाणी विजेच्या खांबावर वेलींचे साम्राज्य आहे. या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिले असते तर आज ही वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.गेले चार दिवस सायंकाळपासूनच पाचगणीची संपूर्ण बाजारपेठ अंधारात गडप होत आहे. नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळत नाही. वीज नसल्याने बोअरवेलच्या मोटार बंद आहेत. अशा अनेक समस्यांना नागरिकांना व व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एवढे असूनही वीजवितरण कंपनीचा कारभार सुस्तावला आहे. अपुरे कर्मचारी आणि कामचा विस्तार पाहता वरिष्ठांनी जादा कर्मचारी किंवा खासगी माणसे घेऊन काम करणे गरजेचे असूनही अधिकारी कानाडोळा करत आहेत. याबद्दल संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर) अन् शुक्रवारी रात्री वीज आली...झाडे खडसणे आणि बुंध्यात सडलेली झाडे तोडण्यास प्रशासन परवानगी देत नसल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल केलेल्या अर्जाचा प्रशासनाने आणि हाय मॉनिटरिंग कमिटीने त्वरित निपटारा करून झाडे तोडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा शुक्रवारी रात्री पूर्ववत झाला.