शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांचा नागेवाडीत राडा

By admin | Updated: February 7, 2016 00:44 IST

आंदोलकांची धरपकड : २३ अटकेत, दगडफेकीत जेसीबी चालक जखमी

बावधन : वाई तालुक्यातील नागेवाडी धरणग्रस्तांचा पुनर्वसनाच्या प्रश्नावर प्रशासन व शेतकरी यांच्यात तोडगा न निघाल्याने शनिवारी धरणग्रस्तांनी नागेवाडी धरणाच्या कॅनॉलचे काम बंद पाडले. यावेळी धरणग्रस्त व पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. यानंतर पोलिसांनी २३ धरणग्रस्तांना अटक करून कालव्याच्या कामास पुन्हा सुरुवात केली़ यावेळी एका धरणग्रस्त शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला़, तर काहींनी जेसीबी चालकावर दगडफेक केली. यामध्ये जेसीबी चालक जखमी झाला.दोन दिवसांपूर्वी तहसील कार्यालयात नागेवाडी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाटबंधारे खाते व महसूल विभाग यांनी सयुंक्तरीत्या बैठकीचे आयोजन केले होते़ यामध्ये कोणताही निर्णायक तोडगा निघाला नाही़ नागेवाडी धरणाच्या प्रकल्पाला १५ वर्षे पूर्ण झाली असून, आजतागायत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे़ पाटबंधारे खात्याने नागेवाडी धरणग्रस्तांना पुनर्वसन प्रक्रियेविषयी योग्य मार्गदर्शन न केल्याने पुनर्वसनाचा प्रश्न अनुत्तरित राहिला़ मध्यंतरीच्या काळात खास बाब म्हणून सहा शेतकऱ्यांचे फक्त कागदोपत्री पुनर्वसन झाल्याचा दाखला पाटबंधारे खात्याने संबंधित सहा शेतकऱ्यांना देण्यात आला. प्रत्यक्ष पुनर्वसन करण्यात आलेच नाही. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळतच गेला़ शनिवारी त्याचे रूपांतर धुमश्चक्रीत झाले. या कारवाईत पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)