शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांपुढे भाकड जनावरांचा प्रश्न

By admin | Updated: December 8, 2015 00:31 IST

चाऱ्यासाठी वणवण: पशुखाद्याचे वाढते भाव; रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती--दूध का दूध.. कष्टावर पाणी

रशीद शेख- औंध--राज्यात गोहत्या बंदीचा कायदा लागू झाल्याने दूध न देणाऱ्या जनावरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुधाचे दर, पोषक चाऱ्याची कमतरता, पशुखाद्याचे वाढते भाव यामुळे दूध देणारी जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे बनले असून, दूध न देणाऱ्या जनावरांचे काय असा प्रश्न दूध उत्पादकांसमोर पडला आहे.सध्या खटाव तालुक्यात खरीप हंगामाबरोर रब्बी हंगाम ही वाया जाईल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. तसेच तालुक्यात शेतकऱ्यांच्या जनावरांना चरण्यासाठी कुरणे, पडिक जमिनी मर्यादित स्वरुपात आहेत. तसेच हिरवा चारा, गवत, मका, सातू, सरकीच्या बिया या पशुखाद्यांची चणचण आहे. त्यामुळे भाकड जनावरांचे आणखी जास्त कुपोषण होते.तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना स्वत:च्या कुटुंबापुरते पाणी मिळविण्यासाठी मैलभर जावे लागते अशी येथील स्थिती आहे. मग जनावरांना पाणी व धान्याचे नियोजन कसे करायचे, वैरण कोठून व किती आणायची. त्यातच दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळेही जनावरे उपासमारीच्या विळख्यात आहेत. मग या भाकड, वृद्ध, आजारी जनावरांचा दूध उत्पादकांनी आर्थिक बोजा कसा पेलायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे संबंधितांचे लक्ष गेले तरच दुष्काळी भागातील शेतकरी टिकणार आहे. सध्या खटाव तालुक्यात ऊसतोड सुरू आहे. जिथे तोड सुरू आहे त्या ठिकाणी शेतकरी जाऊन जनावरांना वाडे आणत आहेत. शेतकरी त्यासाठी दररोज जात आहेत. त्यांचे येण्या-जाण्याचा खर्च, कष्ट, दुधाळ जनावरांमधून येणारे उत्पन्न व भाकड जनावरांचा खर्च वजा जाता दूध उत्पादक तोट्यात असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. ज्या पद्धतीने सुशिक्षित बेकार, तरुण वर्ग या व्यवसायाकडे आकर्षित होऊन वळला होता. आता त्याच वेगाने हे क्षेत्र सोडण्याच्या तयारी असलेले दूध उत्पादक पाहावयास मिळत आहेत. सध्या तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याची मोठी अडचण निर्माण झाली असून, स्थानिक पातळीवर शासकीय यंत्रनेने चारा डेपोची व्यवस्था करावी, एवढीच माफक अपेक्षा खटाव तालुक्यातील दूध उत्पादकांनी व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गोठ्यासह जनावरे काढली विकायला...गेली अनेक वर्षे लाखो रुपये खर्च करून दूध व्यवसाय करणाऱ्या औंधमधील एका शेतकऱ्याने आपला गोठ्यासह जनावरे व सर्व यंत्रसामग्रीच विकायला काढली आहे. दुधाळ जनावरे व भाकड जनावरांचा खर्चाचा ताळमेळ घालता येत नसल्याने हा गोठाच विकण्याचे ठरविले आहे.