शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

येणपेत शिकाऱ्याचा गोळी घालून खून

By admin | Updated: January 8, 2017 23:37 IST

गोळी घातली की चुकून सुटली? : पंचायत समितीच्या माजी सभापतीला अटक

कऱ्हाड : शिकारीला गेलेल्या युवकाचा गोळी घालून खून करण्यात आला. येणपे (ता. कऱ्हाड) येथे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कऱ्हाड पंचायत समितीच्या माजी सभापतीला पोलिसांनी अटक केली आहे.कमलेश लक्ष्मण पाटील (वय २१, रा. येणपे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे, तर किसन विष्णू जाधव (वय ७५) याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, शिकारीला गेल्यानंतर बारा बोअरच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने कमलेशचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गोळी चुकून लागली की मुद्दाम झाडली, हे तपासाअंती स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येणपे येथील किसन जाधव व अजित आकाराम जाधव हे दोघेजण शनिवारी रात्री सातच्या सुमारास गावानजीकच्या सुतारकी नावच्या शिवारात शिकारीसाठी निघाले होते. त्यावेळी गावातीलच कमलेश पाटील हा युवकसुद्धा त्यांच्यासोबत शिकारीला गेला. त्यानंतर रात्री उशिरा कमलेशला गोळी लागल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. ग्रामस्थ तातडीने सुतारकी शिवारात पोहोचले. त्यावेळी कमलेश रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी तातडीने याबाबतची माहिती कऱ्हाड तालुका पोलिसांत दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी परिसराची पाहणी केली. त्यावेळी कमलेश शिवारात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे व त्याच्या छातीवर गोळी लागल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी माहिती घेतली असता कमलेश सायंकाळी किसन जाधवसोबत शिकारीला गेला होता, अशी माहिती समोर आली. तसेच किसन जाधव याच्याकडे बारा बोअरची परवानाधारक बंदूक असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने किसन जाधवला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी चुकून सुटलेली गोळी कमलेशला लागून त्यामध्येच तो ठार झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.याबाबत मृत कमलेशचे वडील लक्ष्मण विठ्ठल पाटील यांनी कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किसन जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. निरीक्षक अण्णासाहेब मांजरे तपास करीत आहेत.शिकारीला तिघे; पण घटनेवेळी दोघेच!गावातून बाहेर पडताना किसन जाधवसोबत कमलेश व अजित जाधव असे तिघेजण होते. मात्र, प्रत्यक्ष घटनेवेळी किसन जाधव व कमलेश हे दोघेजणच शिवारात असल्याचे समोर येत आहे. गोळी लागली त्यावेळी मी घरी गेलो होतो, असे अजितने पोलिसांना सांगितले आहे. मात्र, याची खातरजमा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.