शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST

मलकापूर : मलकापुरात विनामास्क, तसेच सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळणाऱ्या ८ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करीत ८ हजार ५०० रुपयांचा ...

मलकापूर : मलकापुरात विनामास्क, तसेच सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळणाऱ्या ८ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करीत ८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. पोलिसांसह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून सोमवारी दुकानांमध्ये गर्दी करणाऱ्या व्यावसायिकांवर धडक कारवाई केली.

सध्या शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू असून बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांशिवाय इतर दुकाने उघडण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही शहरातील अनेक दुकानांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याची बाब निदर्शनास आल्याने मलकापूर नगरपालिकेसह पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाईची धडक मोहीम राबवली. सोमवारी पोलिसांसह पालिकेच्या विशेष पथकाने कारवाईचा बडगा उगारला. शहरातील मोठ्या व्यावसायिकांसह ८ दुकानांवर दंडाची कारवाई केली. त्यांच्याकडून ८ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.

शिवछावा चौक, आगाशिवनगर परिसरात विनामास्क व दुकानांत गर्दी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. सोमवारी दिवसभर ही विशेष मोहीम सुरू होती. पोलीस व नगरपालिका यांच्या संयुक्त पथकाने मुख्य बाजारपेठेत राबविलेल्या या कारवाईच्या मोहिमेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

चौकट

दुसऱ्यांदा सापडल्यास दुकाने सील

मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुकानांमध्ये गर्दी करणाऱ्या व्यावसायिकांवर धडक कारवाई केली. राजेश काळे यांना स्वतः काही दुकाने दुसऱ्यांदा सापडल्यामुळे सील करण्याची कारवाई केली.

फोटो -

मलकापुरात पोलिसांसह पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांसह दुकानांमध्ये गर्दी करणाऱ्या व्यावसायिकांवर धडक दंडात्मक कारवाई केली. (छाया - माणिक डोंगरे)