शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचे विधानभवन तीन महिन्यांत सुरू होणार (न्यू)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:37 IST

महाबळेश्वर : ‘पुण्याचे विधान भवन येत्या तीन महिन्यांत सुरू करण्यात येणार असून, या विधान भवनाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ...

महाबळेश्वर : ‘पुण्याचे विधान भवन येत्या तीन महिन्यांत सुरू करण्यात येणार असून, या विधान भवनाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होईल,’ असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

डाॅ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘नागपूर येथील विधान भवन सुरू करण्यात आलेे आहे. पूर्वी तिथे हंगामी कामकाज पाहिले जात होते, आता मात्र ते बारामहीने सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे आता पुण्याचे विधान भवन सुरू करण्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनीही मान्यता दिली आहे, असे स्पष्ट करून डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, ‘महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून आता सावरतोय लसीकरणासही आता प्रारंभ झाला आहे. राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिक सक्षमपणे लक्ष देत आहेत. कोरोना काळात आरोग्य व्यवस्था सांभाळताना के्ंद्र व राज्य सरकार यांनी जनतेला योग्यप्रकारे धान्य पुरवठा केला, त्यामुळे उद्योगधंदे बंद असतानाही कोठे कोणाची उपासमार झाली नाही.’

एक मार्चपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाबाबत राज्याच्या ‘बिझिनेस ॲडव्हायजरी’ची मुख्य बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार दोन्ही सदनांतील विरोधी पक्षनेते आघाडी सरकारमधील जे प्रमुख पक्ष आहेत, त्यांचे गटनेते हे उपस्थित असतील. बजेटच्या आनुषंगाने महत्त्वाचे प्रस्ताव या अधिवेशनात सादर केले जातील. एकंदरीत कामकाजाचे स्वरूप या बिझिनेस ॲडव्हायजरीच्या बैठकीत निश्चित होईल, अशी माहितीही डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिली.

चौकट..

महाबळेश्वरचा कायापलट होईल

राज्याच्या मोठ्या प्रश्नांबरोबरच स्थानिक पातळीवरील प्रश्नाकडेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तितकेच लक्ष देऊन सोडवित आहे, याचे उदाहरण म्हणजे महाबळेश्वर येथील वेण्णालेक व बाजारपेठेच्या सुशोभिकरणासाठी त्यांनी १०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. सुशोभिकरणाचा आराखडाही तयार करण्यात आला असून, एका वर्षात महाबळेश्वर शहराचा कायापालट झालेला सर्वांना दिसेल, असा विश्वासही डाॅ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

डॉ. नीलम गोऱ्हे यांचा आयकार्ड फोटो वापरावा