शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यासाठी निधीची तरतूद करा

By admin | Updated: March 3, 2016 00:02 IST

उदयनराजे भोसले : मुख्यमंत्र्यांना निवेदन, मुंबई येथील बैठकीत विविध विषयांवर चर्चा

सातारा : ‘साताऱ्याचे मंजूर असलेले; परंतु रखडलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मसूर, वाठार, रहिमतपूर आदी ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग ओव्हरब्रिज, पोवई नाका उड्डाणपूल तसेच कोंडवे ते सातारा, गोडोली, अजंठा चौक आणि गोडोली ते शिवराज पेट्रोल पंप अखेर रस्ते सुशोभीकरण या कामांकरिता राज्याच्या अंदाजपत्रकात भरीव निधीची तरतूद करावी, सातारा शहर आणि उपनगरांसाठी नवीन कण्हेर उद्भव योजना मंजूर करावी, नगरपरिषदेला राज्याकडून विशेष बाब म्हणून ११ कोटींचे रस्ता अनुदान प्रदान करावे,’ अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांची मुंबईत मुख्यमंत्री कक्षात भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, अ‍ॅड. जे. एस. राजेभोसले, अशोक सावंत, संजय शिंदे, प्रताप शिंदे आदी उपस्थित होते.उदयनराजे भोसले यांनी प्रत्येक प्रश्नाबाबत सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘राज्याचा अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्याला झुकत माप देणे अत्यंत गरजेचे आहे. हा जिल्हा राज्याला वीज पुरवतो.स्वातंत्र्यसैनिक आणि आजी-माजी सैनिकांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा ओळखला जातो. याची राज्य सरकारने जाणीव ठेवून राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील विकासकामांबाबत निधीची तरतूद केली पाहिजे, साताऱ्याला वैद्यकीय महाविद्यालय आम्ही मंजूर करून घेतले, त्यासाठी शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालय स्वतंत्रपणे सलग्न केले; परंतु मेडिकल कॉलेज उभारणीचा मुहूर्त काही राज्य सरकारला सापडत नाही, विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे एक वर्ष वाया गेले. बांधकामासाठी कृष्णा खोऱ्याची जमीन अधिग्रहण करायची आहे, ही कार्यवाही तातडीने होऊन उभारणीचा शुभारंभ लवकर होणे गरजेचे आहे.सातारा शहराच्या विकासाच्या दृष्टीने पोवई नाक्यावर उड्डाणपूल उभारणीचा सर्व्हे झाला आहे. पूल उभारणीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधी तरतूद करावी, कण्हेर उद्भव पाणी योजनेला तातडीने मंजुरी मिळावी, रस्त्यांसाठी एकूण ११ कोटींचे खास बाब म्हणून विशेष अनुदान सातारा नगरपरिषदेला प्रदान करावे, सातारा लोकसभा मतदार संघातील रेल्वे क्रॉसिंग असलेल्या वाठार, रहिमतपूर, मसूर आदी ठिकाणी रोड ओव्हरब्रिज निर्माण करावे, याकरिता अर्थसंकल्पात निधी तरतूद करावी आदी मागण्या खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लावणार!या चर्चावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकल कॉलेजचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याची ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांना दिली. तसेच महसूल मंत्री, आरोग्य मंत्री यांच्याशी मेडिकल कॉलेजबाबत दूरध्वनीवरून चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी सूचना देखील केल्या.