शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वाईत इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST

वाई : वाढलेल्या महागाई व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाई येथे आंदोलन करण्यात आले आहे. तसेच विविध ...

वाई : वाढलेल्या महागाई व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाई येथे आंदोलन करण्यात आले आहे. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार रणजित भोसले यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सततच्या संचारबंदीमुळे सामान्य जनता त्रासून गेली आहे. अनेक कुटुंबांचे जगणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर तसेच गॅस, पेट्रोल व डिझेलच्या किमतीही सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. सामान्य माणसाला जीवनावश्यक गरजांची जुळवाजुळव करणे अवघड झाले आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ रविवारी वाई तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणावे अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, प्रतापराव पवार, रमेश गायकवाड, पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, महादेव मस्कर, अनिल जगताप, मदन भोसले, दिलीप पिसाळ, बाळासाहेब चिरगुटे, बापूसाहेब जमदाडे, राजेश गुरव, अ‍ॅड. रवींद्र्र भोसले, नारायण जाधव, अमोल कदम, राजेंद्र्र सोनावणे, बुवा खरात, मोहन जाधव, प्रसाद मामा देशमुख, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो : ०४वाई

वाई तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने रविवारी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. (छाया : पांडुरंग भिलारे)