शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

येळीव भेगाळला... ग्रामस्थ चवताळला!

By admin | Updated: March 9, 2016 01:13 IST

औंधमध्ये भीषण पाणीटंचाई : खासगी विहीर, कूपनलिकांनी तळ गाठला; तलावात पाणी सोडण्याची मागणी

रशिद शेख -- औंध --औंध गावास पाणीपुरावठा करणाऱ्या येळीव तलावातील पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे औंधमध्ये भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. येळीव तलावात पाणी सोडावे, अशी जोरदार मागणी होत आहे. येळीव तलावातून मागील दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. परिसरातील विहिरींनी व खासगी बोअरवेलने तळ गाठला आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. सद्य:स्थितीत येळीव तलावातील पाणीसाठा पूर्णपणे आटला असून, मागील दोन दिवसांपासून औंधवासीयांना पाणी मिळणे बंद झाले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीटंचाई सुरू झाल्याने संपूर्ण उन्हाळा कसा काढायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. येळीव तलावात पाणी सोडण्याची मागणी औंध ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. प्रशासनाने लवकर पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.मार्चमध्येच पाण्यासाठी दाहीदिशा...जलस्रोत आटले : खटाव-माण-फलटण भागातील स्थितीसातारा : उन्हाळ्याचे मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने बाकी आहेत. मात्र, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील दुष्काळी भागात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. फलटण तालुक्यातील पश्चिम भागाला ज्या धरणातून पाणी मिळत होते. धोम-बलकवडी धरणात पाणीसाठा शिल्लक नाही, तर औंध भागाला पाणीपुरवठा करणारा येळीव तलाव अक्षरश: भेगाळला आहे. माण तालुक्यात १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मार्च महिन्यातच ही अवस्था तर एप्रिल, मे महिन्यात काय अवस्था होईल, याचा विचार केलेलाच बरा. संभाव्य भीषण टंचाईचा विचार करता प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करावी, अशी मागणी दुष्काळी भागातील नागरिकांमधून होत आहे.त्याचप्रमाणे जनावरांसाठी चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)मृतसाठाही संपला --येळीव तलावात मृतसाठा म्हणून काही पाणी राखून ठेवण्यात आले होते. या साठ्यातून गेल्या आठवड्यात चारशे मीटर केबल व पाईप टाकून औंधला पाणी देण्यात आले. परंतु त्याचाही काही उपयोग नसून तेही पाणी संपले आहे.औंधमध्ये पाण्याची भीषण टंचाई असून प्रशासनाने लवकरात लवकर येळीव तलावात पाणी सोडावे. आम्ही तशी मागणी आम्ही खटाव तहसीलदारांकडे केली आहे.- रोहिणी थोरात, सरपंच, औंध