शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर

By admin | Updated: June 25, 2016 00:41 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : नगरपंचायत प्रभाग रचनेचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर

सातारा : जिल्ह्यातील आठही पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी शुक्रवारी प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. दरम्यान, जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या मेढा, पाटण, दहिवडी, वडूज आणि खंडाळा नगरपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, येत्या १४ जुलैपर्यंत या नगरपंचायतींची आरक्षण सोडत होणार असल्याने या शहरांमध्ये निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण यासह विविध माहितीचा प्रारूप प्रस्ताव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सादर केला आहे. तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या मेढा, पाटण, दहिवडी, वडूज आणि खंडाळा या ग्रामपंचायती बरखास्त करून तेथे नगरपंचायती अस्तित्वात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने तातडीने या नगरपंचायतीच्या निवडणुकीची कार्यवाही सुरू केली आहे. या पाचही नगरपंचायतींची सदस्य संख्या विभागीय आयुक्तांनी निश्चित केली होती. पाचही शहरांमध्ये प्रत्येकी १७ नगरसेवक निवडून जाणार असून, यात ९ महिला व ८ पुरुष असणार आहेत.या नगरपंचायतीतील प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तेथील मुख्याधिकारी किंवा तत्सम अधिकाऱ्यांतर्फे तयार करण्यात येऊन ४ जुलैपर्यंत तो मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे. जिल्हाधिकारी ८ जुलैपर्यंत या प्रस्तावास मान्यता देतील. त्यानंतर प्रत्येक नगरपंचायतीच्या सदस्यपदाची आरक्षणासह सोडत काढण्याची नोटीस ११ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर १४ जुलैपर्यंत आरक्षणाची सोडत मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे. १८ ते २७ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी आहे. २ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी हरकतींवर सुनावणी देणार आहेत. ६ आॅगस्टपर्यंत हरकतींवर अभिप्राय देऊन अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येईल. ११ आॅगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडून प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता मिळणार आहे. (प्रतिनिधी)