शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

अंदाज समितीकडून प्रकल्पांची पाहणी

By admin | Updated: November 21, 2015 00:24 IST

सात आमदारांचा सहभाग : हणबरवाडीसह टेंभूचा घेतला आढावा

कऱ्हाड : विधानसभेतील आमदारांच्या अंदाज समितीने हणबरवाडी-धनगवाडी सिंंचन योजनेसह टेंभू उपसा सिंंचन प्रकल्पाची टेंभू येथे आणि सांगली जिल्ह्यातील तिसऱ्या टप्प्याची पाहणी केली. समितीमधील सात आमदारांची अधिकाऱ्यांशी विविध मुद्यावर चर्चा सुरू असताना या प्रकल्पासाठी खूप कमी प्रमाणात निधीची तरतूद झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यावर आमदार अनिल बाबर यांनी या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण होऊन शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी पोहचण्यासाठी तीन वर्षे प्रतिवर्षी ३०० कोटींच्या निधीची मागणी केली. दरम्यान, टेंभू प्रकल्पासाठी जमिनी घेताना शासकीय नोकरीसह शेतीला पाणी देण्याचे आश्वासन शासनाने पाळले नसल्याची खंत टेंभू ग्रामस्थांनी व्यक्त केली. जिल्ह्यात बुधवारी दाखल झालेल्या विधानसभेतील दहा आमदारांच्या अंदाज समितीमधील अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर, सदस्य मिलिंद माने, बाळासाहेब मुरकुटे, नरेंद्र जगताप, शशिकांत खेडेकर, धैर्यशील पाटील यांनी पाणी प्रकल्पांची पाहणी केली. त्यांच्यासमवेत समिती सचिव म्हणून अशोक मोहिते सहभागी होते. कऱ्हाड तालुक्यातील हणबरवाडी-धनगरवाडी पाणी योजनेची पाहणी केली. या योजनेसाठी मंजूर निधी आणि झालेले काम आणि अजून अपेक्षित निधी याबाबत अधिकाऱ्यांकडून समितीने माहिती घेतली. गुरुवारी सकाळी टेंभू उपसा जलसिंंचन प्रकल्पास आमदारांच्या समितीने भेट दिली. यावेळी अधीक्षक अभियंता गुणाले यांनी प्रकल्पाच्या मंजुरीपासून झालेली निधीची तरतूद आणि प्रकल्पाचा आराखडा याविषयी माहिती दिली. यावेळी समितीने प्रकल्पाच्या पंपहाउससह सर्व विभागाची पाहणी केली. अधिकाऱ्यांशी चर्चा करताना समितीच्या आमदारांनी प्रकल्पाच्या प्रश्नांबाबत विचारणा केली. यावेळी प्रकल्पाला पूर्वी सुमारे १५० कोटींची तरतूद दरवर्षी होत होती. आता ८० कोटीची तरतूद झाली असून, पूर्वीच्याच कामाचे जवळपास ४० कोटी रुपये देणे बाकी असल्याने या प्रकल्पाच्या पूर्णत्त्वासाठी आणखी भरीव निधीची गरज व्यक्त केली.टेंभू येथील प्रकल्पाची पाहणी करून समिती परत प्रकल्पाचा तिसरा टप्पा पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यात गेली. या दौऱ्यात सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्यासह जलसंधारण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) 'टेंभू गावावर अन्याय‘टेंभू ग्रामस्थांनी आमदारांच्या अंदाज समितीला निवेदन देऊन गावावर अन्याय झाल्याचे सांगितले. बागायती शेतीमध्ये हा प्रकल्प विरोध असतानाही उभारला. हा प्रकल्प उभारताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारने जमिनी गेलेल्या कुटुंबातील मुलांना शासकीय नोकरी आणि गावातील शेतीला पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. ते शासनाकडून आजपर्यंत पाळले गेले नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावर हे प्रश्न शासनासमोर समिती मांडेल,’ असे आश्वासन समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी दिले.