शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम समाजाच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:42 IST

फलटण : मुस्लीम समाजाचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून, त्यांची सोडवणूक त्वरित व्हावी, अशी मागणी मुस्लीम समाजातील विविध ...

फलटण : मुस्लीम समाजाचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून, त्यांची सोडवणूक त्वरित व्हावी, अशी मागणी मुस्लीम समाजातील विविध संघटनांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन फलटणचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले.

अल्पसंख्याक मंत्रालयाचे वार्षिक बजेट किमान दोन हजार कोटी रुपये करावे, प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक विकास संचालक या पदावर उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नियुक्त करावेत, अल्पसंख्याक समाजातील सामाजिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देऊन शासन योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी या संस्थांना विकास प्रक्रियेत सामील करावे, राज्य व जिल्हावार विकास प्रक्रिया व जिल्हा अग्रणी बँकेच्या वार्षिक वित्तपुरवठा आराखड्यामध्ये प्राधान्याने लक्ष देऊन पंधरा टक्के वित्त पुरवठा होण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, अल्पसंख्याक विकास योजना जनजागृतीसाठी व पंतप्रधान पंधरा कलमी कार्यक्रम प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांना किमान दहा लाख रुपये निधी देण्यात यावा, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समिती नवीन शासन निर्णय आल्यानंतर तातडीने स्थापन कराव्यात, वक्फ महामंडळाला आयएएस, आयपीएस, मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करावेत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुस्लिमांना सरसकट शैक्षणिक आरक्षण देण्यात यावे, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव यांना देण्यात आले. तत्पूर्वी मुस्लीम समाजाचा जनजागृती मेळावा पार पडला. यावेळी महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरमचे अध्यक्ष जाकीरभाई शिकलगार, मुस्लीम ऑल इंडिया ओबीसी संघटनेचे अध्यक्ष सादीकभाई शेख, हाजी गुलाब शेख, हाजी निजामभाई आतार, अब्दुलभाई सुतार, अ‍ॅड. समीर इनामदार, अश्फाक खान, जमशेद पठाण, जावेद शेख, सादीक बागवान आदी उपस्थित होते.