चाफळ : माजगावचे सुपुत्र, पाटण तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष तसेच मारुल हवेली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मधुकर एकनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून व विशेष प्रयत्नातून माजगावातील युवक व शिक्षकांच्या सहकार्याने गेली चार महिने सुरू असलेल्या ऑनलाईन योग शिबिराचे बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी उंब्रज येथील वीज वितरण कंपनीचे उपअभियंता चेतन कुंभार, पंचायत समिती सदस्या रूपाली पवार, बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम पाटील, रविराज पाटील, महेश पाटील , माजी गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील उपस्थित होते.
दरम्यान, स्पर्धेमध्ये अनुक्रमे राजवर्धिनी रविराज पाटील, दुर्गेश्वरी भोसले, शर्वरी मोरे, अंजली पवार यांनी अनुक्रमे दुसरा क्रमांक पटकावला. ऋचा उंडे हिने तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेतील एकूण दहा विजेत्यांना बक्षीस देण्यात आले; तर उर्वरित सर्व परीक्षार्थींना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
ग्रामसेवक संघटनेचे प्रमुख अरविंद माळी, सामाजिक कार्यकर्ते भरत वरेकर, बाळकृष्ण पवार, माजगाव सोसायटीचे चेअरमन जालिंदर जाधव, नंदकुमार पाटील, रघुकूल शिक्षण संस्थेचे महेश पाटील, नंदकुमार थोरात, धनाजी काटकर, अनिल भोसले, भीमराव साळवे, दीपक जाधव, राजेश पाटील, हिंमतराव देशमुख, गोरख चव्हाण, सुरेश यादव, शिवाजी कदम उपस्थित होते.