शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरच्या लसीकरण केंद्रांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:37 IST

मलकापूर शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याकरिता काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आज येथील भारती विद्यापीठ विधि महाविद्यालयात व गणेश ...

मलकापूर शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याकरिता काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आज येथील भारती विद्यापीठ विधि महाविद्यालयात व गणेश कॉलनीमधील वुमन्स फॅसिलिटी सेंटर अशी पहिली दोन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. या लसीकरण केंद्रांचा बुधवारी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या वेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र यादव, पालिकेचे नियोजन सभापती प्रशांत चांदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण सभापती शकुंतला शिंगण, नुरजहाँन मुल्ला, नगरसेवक सागर जाधव, आबासाहेब सोळवंडे, कमलताई कुराडे, अलका जगदाळे, स्वाती तुपे, निर्मला काशीद, नंदा भोसले, भारती पाटील, किशोर येडगे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कोरोनाला थांबविण्यासाठी मलकापूरने चांगले काम केले आहे. कोरोना होऊच नये म्हणून लस घेणे गरजेचे आहे. मलकापूरचा विस्तार पाहता महामार्गाच्या पूर्व-पश्चिम बाजूंस लसीकरण केंद्रांची सोय केली आहे. या वेळी प्रथम उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह नगरसेवकांनी स्वतः लस घेतली. दरम्यान, शहरातील सर्व नागरिकांनीही न घाबरता लस घ्यावी, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑनलाइन केले.

कोट

मलकापूर शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता लसीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी दररोज लस देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरात लवकरच दैनंदिन लस उपलब्ध होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जास्तीतजास्त नागरिकांनी लस घ्यावी.

- नीलम येडगे,

नगराध्यक्षा

फोटो

मलकापुरातील कोरोना लसीकरण केंद्रांचा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आॉनलाइन शुभारंभ केला. (माणिक डोंगरे)