शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

कऱ्हाडात मटका अड्ड्यावर छापा

By admin | Updated: January 15, 2017 01:00 IST

सतरा बुकींना अटक : पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त; उपअधीक्षक पथकाची कारवाई

कऱ्हाड : शहरातील कृष्णा कॅनॉल परिसरातील मटक्याचा मुख्य अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. यावेळी मटका घेणाऱ्या तब्बल सतरा बुकींना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून पावणेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आली. सुनील वासुदेव बेलवणकर (वय ४६), नदीम खालिद बागवान (२३), अय्याज शब्बीर शेख (२८), राहुल शामराव पाटील (३७), जुबेर यासीन पटेल (२८), तात्यासाहेब हणमंत सावंत (३१), जावेद अस्लम पठाण (३२), युनूस महंमद तांबोळी (४८), असद युसूफ पठाण (२१), मोईन अल्ताफ पठाण (२१), मोहनकुमार बाळकृष्णा बुराडे (४३), रमेश गजानन शिंदे (५२), सुहेल सलीम पटेल (३३, सर्व रा. कऱ्हाड), रणजित दिलीप मोरे (३६), फिरोज याकुब शेख (३६), अनिल सदाशिव वीर (३०) तिघेही, रा. मलकापूर), विशाल हणमंत सावंत (२७, रा. खोडशी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या मटका बुकींची नावे आहेत. कऱ्हाडलगत कृष्णा कॅनॉलनजीक सैदापूर येथे शंकर कांतिलाल कणसे यांच्या मालकीची दुमजली इमारत आहे. या इमारतीत शहरासह परिसरातील मटका बुकी एकत्र येत असून, ती इमारत म्हणजे मटक्याचे मुख्य केंद्र आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला संबंधित इमारतीवर छापा टाकण्याचे आदेश दिले. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उपअधीक्षक शिवणकर यांच्यासह पथक त्या ठिकाणी पोहोचले. पथकाने इमारतीवर छापा टाकला. त्यावेळी पंधरा ते वीस बुकी वेगवेगळ्या गोल टेबलवर बसून मटका घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले. तसेच टेबलवर पडलेल्या मटक्याच्या चिठ्ठ्या, रोकड व इतर साहित्य हस्तगत केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. शहरानजीकच मटक्याचा हा मुख्य अड्डा असल्याने येथून दिवसाकाठी लाखोची उलाढाल होत असल्याचे पोलिस तपासांतून समोर येत आहे. या कारवाईने मटका बुकींमध्ये खळबळ उडाली आहे. कारवाईची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे.