शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

वांगी, फ्लॉवर, काकडीचे दर गडगडले

By admin | Updated: July 17, 2014 23:18 IST

गृहिणींचा जीव भांड्यात : भाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात

सातारा : गेल्या काही दिवसांत साठी ओलांडलेल्या भाज्यांचे दर अखेर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. गत सप्ताहाच्या तुलनेत या आठवड्यात वांगी, फ्लॉवर व काकडीच्या दराने नीचांक पातळी गाठली आहे. तर आले, गवारी आणि टोमॅटो अद्यापही तेजीतच आहेत.पावसाने ओढ दिल्याचा परिणाम म्हणून गेल्या दोन आठवड्यांपासून भाज्यांचे दर चांगलेच तेजीत होते. गत महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्या होत्या. मुलांच्या आणि पतीच्या डब्याला केवळ सुक्की भाजी देऊन गृहिणींनी काही दिवस ढकलले. पण, एकाच भाजीची सवय नसलेल्यांच्या हे पचनी पडले नाही. रोज आज काही तरी वेगळं कर याचा नारा ऐकून गृहिणी हैराण झाल्या होत्या. मंडईत जाऊन भाजी आणायची म्हटली तर शंभर-दोनशे रुपये खर्च करून अर्धी पिशवीही भाजी येत नव्हती, अशी अवस्था झाली होती. त्यामुळे भाज्यांची आवक कमी आणि पैशांची जावक जास्त अशी अवस्था झाली होती.गत सप्ताहापासून जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. हा पाऊस नव्या पिकांसाठी उपयुक्त ठरत आहे. पावसाच्या आगमनाने शेतकरी शेतातून मोठ्या प्रमाणावर भाजी काढत असल्यामुळे या सप्ताहात भाज्यांची आवक समाधानकारक वाढली आहे. गेल्या काही दिवसांत भाज्यांच्या वाढत्या दराचा धसका घेऊन सध्या मंडईमध्ये सामसूम आहे. दर कमी होऊनही ग्राहकांअभावी मंडई ओस पडली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ग्राहकांनी भाजी मंडईत येऊन खरेदी करावी, अशी इच्छा व्यापारी व्यक्त करत आहेत. भविष्यातही हे दर असेच कमी राहावेत आणि भाज्या खाण्याचा आनंद घेता यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)वांगी-१००-१५०४०-८०टोमॅटो-२००-३००१००-३५०कोबी-१००-१३०१००-१२०फ्लॉवर- १५०-२००८०-२००दोडका-२५०-३००२५०-३००कारली-२५०-३००----कांदा-२००-२६०१७०-२५०बटाटा-१८०-२१०१८०-२००लसूण-२००-४००२००-४५०आले४००-६२०४००-६५०मिरची४५०-५००२५०-३००ढब्बू२००-२५०१००-२००दुधी६०-१००५०-१००भेंडी१५०-२५०१५०-३००गवारी२००-२७०२००-२८०काकडी१५०-२००४०-६०शेवगा५००-६००३००-३५०पावटा२००-२५०१५०-२००वाल घेवडा३००-३७०२००-२५०भुईमूग ओली२५०-३००२००-२६०मेथी६००-८००६००-७००कोथिंबीर५००-७००३००-५००आवक नाही पालक, चाकवतभाज्यांचे दर आवाक्यात आल्यामुळे खरंच जीव भांड्यात पडला आहे. गेले काही दिवस एका वेळी एकच भाजी करत होतो. आता पुन्हा एकदा ताट भरून जेवण बघून आनंद झाला. टोमॅटोचे दरही थोडे उतरणे आवश्यक आहे.- विद्या पवार, गृहिणीगत सप्ताहात हिरवी मिरची खूपच चढ्या दराने विकली गेली. या सप्ताहात तिचा दर निम्म्याने खाली आला. मिरचीच्या दरातील ही उच्चांकी घसरण ठरली. मात्र, आवक अधिक आणि विक्री कमी यामुळे मिरची खराब झाली. ही खराब झालेली मिरची व्यापाऱ्यांनी आज अक्षरश: रस्त्यावर टाकली होती.