शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मागील घडामोडींचा निवडणुकीवर होणार परिणाम

By admin | Updated: November 13, 2016 01:21 IST

स्वच्छता अभियानामुळे वेंगुर्ले चर्चेत : तर नगरपरिषदेवर बरखास्ती, पोटनिवडणुकीची नामुष्की; कुरघोडी करणाऱ्यांचा बदला घेण्याचे संकेत; तर संबंधितांना प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान

सातारा : पाचशे अन् हजारांच्या नोटा रद्द झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील शेकडो बँकांमध्ये उसळलेली गर्दी तिसऱ्या दिवशीही कायमच होती. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यातील बँकांमध्ये सुमारे एक हजार कोटीच्या रद्द नोटा जमा झाल्या असून, यात दिवसेंदिवस वाढच होणार असल्याची शक्यता बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.सातारा जिल्ह्यात सरकारी, सहकारी, खासगी अन् ग्रामीण अशा एकूण ३३ बँकांच्या ५४८ शाखा कार्यरत आहेत. केवळ सर्वाधिक शाखा ‘बँक आॅफ महाराष्ट्र’च्या असून, पहिल्या दोन दिवसांमध्ये त्यांच्या ६२ शाखांमध्ये एकूण ६० कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महादेव शिराळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पाचशे अन् हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी सर्वाधिक गर्दी भारतीय स्टेट बँकेच्या शाखांमध्ये दिसून येत आहे. प्रतापगंज पेठ शाखेत एका दिवसात सुमारे १६ कोटींच्या नोटा जमा होण्याची विक्रमी घटना घडली असून, इतर ठिकाणीही जवळपास अशीच आकडेवारी आहे. जिल्ह्यात या बँकेच्या पन्नास शाखा असून, शहरात सहा ठिकाणी प्रचंड गर्दी तिसऱ्या दिवशीही अनुभवयास मिळाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४१ विस्तारित कक्षांसह एकूण ३१३ शाखांमध्ये एका दिवसात दीडशे कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्याची माहिती प्रभारी सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तिसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे शनिवारी संध्याकाळपर्यंत जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमधील जमा नोटांचा एकूण आकडा चारशे कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. (प्रतिनिधी)महिनाभराची उलाढाल तीन दिवसांत...ज्या बँकेच्या एखाद्या शाखेची महिनाभराची उलाढाल जेवढी असते, तेवढी रक्कम केवळ तीन दिवसांमध्ये मोजण्यात सर्व बँक कर्मचारी व्यस्त झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्य सातारकरांनी अनेक तास रांगेत उभारून बँकेत जमा केलेल्या नोटांची ही आकडेवारी आहे. रविवारीही सातारा जिल्ह्यातील बँका ग्राहकांसाठी सुरूच राहणार आहेत. अद्याप बहुतांश एटीएम केंद्रांमध्ये नोटा भरण्यात न आल्याने रांगांची परंपरा चौथ्या दिवशीही सुरूच राहणार असल्याची शक्तता व्यक्त केली जात आहे.