शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यात सापडली प्रतिष्ठित मंडळी

By admin | Updated: September 2, 2015 23:25 IST

केळघर येथे कारवाई : बाराजण अटकेत; रोख रकमेसह दोन लाख नऊ हजारांचा ऐवज जप्त

मेढा : केळघर, ता. जावळी येथील बसस्थानकानजीक अवैधपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मेढा पोलिसांनी मंगळवारी रात्री दहा वाजता छापा टाकून बाराजणांना अटक केली. यावेळी रोख रकमेसह सुमारे २ लाख ९ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. अटक केलेल्यांमध्ये तालुक्यातील राजकीय लोकप्रतिनिधीच्या नातेवाइकांचा समावेश आहे. दरम्यान, या सर्वांना मेढा न्यायालयात हजर केले असता, वैयक्तिक जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळघर येथे अवैध जुगार सुरू असल्याची माहिती मेढा पोलिसांना मिळाली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केळघर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्याबाबत काही नागरिकांनी पोलिसांकडे तोंडी स्वरूपात तक्रारीही केल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास मेढ्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी केळघर येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. दरम्यान, या छाप्यात सतीश पार्टे, एजाज कलाल, संतोष पार्टे, सागर कलाल, शांताराम शिर्के, प्रदीप कासुर्डे, संतोष वडार, विजय मानकुमरे, विकास कासुर्डे, संजय बेलोशे, सचिन कासुर्डे व मारुती शेलार या बाराजणांना जुगार खेळताना रंगेहाथ पडकले. पोलिसांनी या बाराजणांना अटक केली आहे. यावेळी पाच दुचाकी व रोक रक्कम नऊ हजार ९० असा एकूण २ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तालुक्यात अवैध व्यवसायाविरुद्ध मेढ्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी केलेल्या कारवाईमुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)राजकीय वर्तुळात खळबळजनतेचे नेतृत्च करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांना जुगारप्रकरणी पकडण्याची ही दुसरी, तिसरी वेळ असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताना काहीनी खोटी नावे सांगितल्याची मेढ्यात चर्चा असून, याप्रकरणी पोलीस शहानिशा करीत आहेत.