शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रेशर पंप’ने दुधाचे कॅन, मशिनरीची स्वच्छता

By admin | Updated: May 20, 2016 00:06 IST

दूधउत्पाकांमध्ये सजगता : दुधाची भांडी ओल्या कपड्याने पुसून उन्हात सुकविण्याची कल्पना -- लोकमत जलमित्र अभियान

सातारा : दूध डेअरीमध्ये अत्यंत स्वच्छता ठेवावी लागते. यामध्ये थोडा जरी निष्काळजीपणा केला तरी सर्व दूध खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे डेअरीमध्ये वापरण्यात येणारी मशिनरी, कॅन, गाड्या स्वच्छ धुवाव्या लागतात. यासाठी जास्त पाणी लागत असले तरी सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता डेअरीमालकांनी स्वच्छतेचे विविध उपाय केले आहेत.दुधाचा दुसऱ्या पदार्थांशी संबंध आला की दूध नासते. त्यामुळे डेअरीचालकांना मोठा तोटा सहन करावा लागतो. यासाठी दूध डेअरीमध्ये कमालीची स्वच्छता ठेवली जाते. परंतु दुधाची हेळसांड होतच असते. याबाबत डेअरीमालक सतर्क झाले असून दूध सांडू नये, याबाबत ते सर्वांना सूचना करत आहेत. आता गावोगावी दूध संकलन केंद्र सुरू झाली आहे. अशा ठिकाणी दूध संकलित करण्यासाठी वापरण्यात येणारी प्लास्टिकची कॅन स्वच्छ धुतली जातात. पाणीटंचाई लक्षात घेता अनेक डेअरीचालक स्प्रे पंपच्या साह्याने कॅनची स्वच्छता करतात. त्यानंतर ती स्वच्छ कापडाने पुसून उन्हात ठेवतात. यामुळे कॅन चांगले स्वच्छ होतात.मोठ्या दूध डेअरीमध्ये मशिनरींची स्वच्छता महत्त्वाची असते. वाई येथील तानाजी गाढवे हे कमी पाण्यात स्वच्छता कशी होईल, याकडे लक्ष देत असतात. यासाठी सुरुवातीला ओल्या कापडाने सर्व मशिनरी पुसून घेतली जाते. त्यानंतर हायप्रेशर पंपने पाणी मारले जाते. यामुळे कमी पाणी लागते. (प्रतिनिधी)स्वच्छताही अन् पाणीबचतहीयंदा उन्हाची तीव्रता जास्त असून पाणीटंचाईचे संकट सर्वांसमोर आहे. दूध चांगले राहण्यासाठी डेअरीची स्वच्छता महत्त्वाचा भाग असतो. मोठ्या मशिनरी, कॅन, दूध वाहतुकीच्या गाड्या स्प्रे पंपने धुतो. त्यामुळे आता पाणी कमी लागत आहे.- तानाजी गाढवे, गाढवे डेअरी, वाईदूध खाली सांडू देत नाहीआमच्या भागातील शेतकरी व दूध उत्पादकांकडून आम्ही दुधाचे संकलन करतो. संकलन केंद्रात येणारे दूध कॅनमध्ये साठविले जाते. ती कॅन कमी पाण्यातही चांगली स्वच्छ केलेली असतात. तसेच डेअरीमध्ये दूध खाली सांडणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाते.- दीपक पोळ, माउली दूध संकलन केंद्र, धोम