शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खो-खो स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: December 23, 2014 23:46 IST

इचलकरंजी : आंतरप्रांतीय शालेय स्पर्धा; २५ राज्यांचे संघ सहभागी होणार इचलकरंजी : आंतरप्रांतीय शालेय स्पर्धा; २५ राज्यांचे संघ सहभागी होणार

इचलकरंजी : शहरातील नगरपरिषदेच्या जिम्नॅशियम मैदानावर आंतरप्रांतीय राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा होणार असून, स्पर्धेसाठी क्रीडांगण व प्रेक्षक गॅलरीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशभरातून २५ राज्यांचे मुला-मुलींचे संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा विभाग व इचलकरंजी नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ यांनी संयुक्तपणे आयोजित केली असल्याची माहिती क्रीडा उपसंचालक एन. व्ही. मोटे यांनी पत्रकारांना दिली.जिम्नॅशियम मैदानावर खो-खो साठी चार क्रीडांगणे तयार करण्यात आली असून, एकाचवेळी पंधरा हजार प्रेक्षक सामने बघू शकतील, अशी प्रेक्षक गॅलरी उभारलेली आहे. ही स्पर्धा नगरपालिका शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून इचलकरंजीत घेण्यात येत आहे. ही स्पर्धा २६ ते ३० डिसेंबर दरम्यान होत आहे, असे सांगून उपसंचालक मोटे म्हणाले, स्पर्धेसाठी ६०० खेळाडू, १०० स्वयंसेवक, पंच, गुणलेखक असे सुमारे ८०० लोक सहभागी होतील. त्यांची राहण्याची सोय तेरापंथी भवन, त्यागी भवन, डीकेटीई इंग्लिश स्कूल, शासकीय विश्रामधाम, वेदभवन, आदी ठिकाणी केली आहे. सामने दिवस-रात्र अशा सत्रात होणार असून, स्पर्धेच्या आदल्या दिवशी बहुतेक परराज्यांतील मुला-मुलींचे संघ दाखल होतील.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शहरातील विविध शाळांमधील क्रीडाशिक्षकांच्या विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. अन्य राज्यांतून रेल्वेने येणाऱ्या संघांसाठी मिरज येथे स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. खेळाडूंची ने-आण करण्यासाठी मिरज ते इचलकरंजी अशी वाहतुकीची सोय केली आहे, असे मोटे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)