शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात मतदान यंत्रणा सज्ज

By admin | Updated: October 14, 2014 23:25 IST

८७ उमेदवारांचे नशीब होणार ‘मशीनबंद’

सातारा : जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघांत उद्या, बुधवारी मतदान असल्यामुळे आमदारकीसाठी नशीब अजमावणाऱ्या ८७ उमेदवारांचे भवितव्य ‘मशीनबंद’ होणार आहे. दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी सायंकाळी एसटी बसने रवाना झाले. यासाठी आवश्यक असणारा बंदोबस्तही समवेत आहे. मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे. दरम्यान, मतमोजणी रविवारी (दि. १९) होणार आहे. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, ८७ उमेदवार आमदारकीसाठी नशीब अजमावत आहेत. फलटणमध्ये १४, वाई १०, कोरेगाव ८, माण १२, कऱ्हाड उत्तर ७, कऱ्हाड दक्षिण १२, पाटण १५, सातारा विधानसभा मतदारसंघात ९ उमेदवार आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मतपत्रिका त्यांना यापूर्वीच मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या मतपत्रिका संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे जमा केल्या आहेत. १०,१९९ टपाली मतपत्रिका सैनिकांना पाठविण्यात आल्या असून, त्यापैकी ३,४५८ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. मतमोजणीच्या दिवशी रविवारी (दि. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत जेवढ्या मतपत्रिका येतील, त्याच मतदान म्हणून गृहीत धरल्या जाणार आहेत. आठ आजी... चार माजी...जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत आठ विद्यमान, चार माजी आमदार नशीब अजमावत आहेत. यातील दोघेजण मंत्री होते. जिल्ह्यात २० अतिसंवेदनशील, तर २८ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. एकूण २९५० मतदान केंद्रांपैकी २,९२९ मतदान केंदे्र संपर्कक्षेत्रात असून, उर्वरित २१ मतदान केंद्रे संपर्कहीन असल्यामुळे तेथे वायरलेस यंत्रणा कार्यान्वित केली आहे. (प्रतिनिधी)