शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लेकाचं कौतुक ऐकून ‘त्या’ आईनं सोडला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:47 IST

सातारा : शिक्षण मर्यादित, भांडवल-साधनसामग्रीची वानवा हे खरं असलं तरी तो स्वत:ला सिद्ध करून दाखवेल, ही तिची वेडी माया ...

सातारा : शिक्षण मर्यादित, भांडवल-साधनसामग्रीची वानवा हे खरं असलं तरी तो स्वत:ला सिद्ध करून दाखवेल, ही तिची वेडी माया नव्हे तर खात्री. तर त्यानेही जगासमोर स्वत:ला सिद्ध केलं. याबाबत वर्तमानपत्रात आलेली बातमी तिला मुलाने ऐकवली. स्वत:च्या लेकाची ही प्रसिद्धी ऐकल्यानंतर या माऊलीने जगाचा निरोप घेतला. लक्ष्मी भिकू भंडारे (वय ६३) असे या मातेचं नाव.याबाबत माहिती अशी की, ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात गजवडी (ता. सातारा) येथील सचिन भंडारे या तरुणाची बातमी प्रसिद्ध केली होती. या तरुणाचीच लक्ष्मी भंडारे या आई होत.शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सचिन भंडारे याने ट्रॅक्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बँकेने काही कारणाने त्याला कर्ज देण्याचे नाकारले. ना उमेद न होता या प्रसंगालाच संधी मानून त्याने स्वत: ट्रॅक्टर तयार करण्याचा निर्णय घेतला आणि काही महिन्यांत त्याने दारात स्वत:चा ट्रॅक्टर उभा केला. तेही जवळपास निम्म्या किमतीत.दरम्यान, सचिन ट्रॅक्टर तयार करतोय, हे समजल्यानंतर सुरुवातीला त्याला चेष्टेत काढण्याचा प्रयत्न लोकांनी केला. मात्र, त्याची आई लक्ष्मी यांना आपल्या मुलाच्या कार्यकुशलतेवर विश्वास होता. त्यांनी त्याला ना उमेद न करता प्रोत्साहन दिले.सचिनच्या या यशस्वी प्रयत्नाची कहाणी जाणून घेऊन ती लोकांपुढे मांडण्यासाठी ‘लोकमत’ची टीम त्याच्या घरी पोहोचली. त्यावेळी लक्ष्मी भंडारे यांच्या चेहऱ्यावर लेकाच्या यशाचे कौतुक लपून राहू शकले नाही.परिस्थितीमुळे मुलगा पुढे शिकू शकला नसला तरी त्याने समाजाच्या उपयोगाचे काहीतरी करून दाखवले. हे त्यांच्या चेहºयावरून दिसून येत होते. हे त्याचे कार्यकौतुक वर्तमानपत्रात छापून आलेले पाहण्याची त्यांना उत्सुकता होती. मात्र शनिवारी रात्री लक्ष्मी भंडारे यांना प्रकृती अस्वास्थामुळे साताºयातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे त्या शुद्धीवरही आल्या. शुद्धीवर येताच त्यांनी पेपरात सचिनची बातमी आली का? असं विचारलं.एवढ्या भल्या पहाटे पेपर कोठे मिळायचा, म्हणून सचिनने मोबाईलवर आॅनलाईन ‘लोकमत’ पेपर डाऊनलोड करून घेतला. मोबाईलवरच त्याने स्वत: तयार केलेल्या ट्रॅक्टरची बातमी आईला वाचून दाखवली. बातमी ऐकल्यानंतर आपण टाकलेला विश्वास लेकाने सार्थ करून दखवला, या जाणिवेतून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यानंतर काही तासांत त्या माऊलीने समाधानाने इहलोकाचा निरोप घेतला. यामुळे कुटुंबावर दु:खाची कुºहाड कोसळली.माउली कायम वर्कशॉपमध्येच असायचीट्रॅक्टर निर्मितीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी पैसे देण्याबरोबरच त्याला मदत करण्यासाठी ही माऊली कायम त्याच्या वर्कशॉपमध्ये असायची. त्यामुळे काम करण्यात प्रोत्साहन मिळायचे. आईने दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सचिनने अविरत परिश्रम घेतले. त्याचे फलित म्हणजे आज त्याचा स्वत:चा ट्रॅक्टर आहे, अशा भावना सचिन भंडारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.