शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

पूजाची अन् वीरमातेची घेतली भेट

By admin | Updated: July 8, 2015 22:03 IST

भिरडाचीवाडी : भुर्इंज पोलिसांनी दाखवली माणुसकी

भुर्इंज : ओझर्डे स्फोटातून बचावलेल्या पूजा पवार या चिमुरडीची चौकशी करतानाच तिला कपडे, फळे व खाऊ दिला. तसेच यावेळी भिरडाचीवाडीतीलच २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यातील शहीद बापूसाहेब धुरगुडे यांच्या आईची भुर्इंज पोलिसांच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी भेट घेऊन चौकशीही केली. यानिमित्ताने पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन घडले. कोल्हापूरच्या कण्हेरी मठातील रुग्णालयातून घरी आलेल्या पूजा पवारला भेटण्यासाठी पवार तिच्या घरी गेले होते. जाताना त्यांनी पूजासाठी नवे कपडे, फळे व खाऊही सोबत नेला होता. पूजाशी गप्पा मारताना ‘तू आता बरी झाली आहेस, घाबरू नकोस,’ असे सांगून तिच्या कुटुंबीयांनाही दिलासा दिला. आर्थिक मदतीसाठी कधीही कसलीही अडचण आली तर संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर ते याच गावात असणाऱ्या वीरमाता बनुबाई धुरगुडे यांना भेटायला गेले. बनुबाई धुरगुडे यांचे सुपुत्र बापूसाहेब धुरगुडे हे दि. २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यात शहीद झाले होते. दरवर्षी २६ नोव्हेंबरला सहायक पोलीस निरीक्षक पवार त्यांच्या घरी जातातच; पण यावेळी अचानकपणे ते या वीरमातेला भेटून त्यांची चौकशी केली. (वार्ताहर)आठवणी जागविल्या...प्रकृती ठीक नसल्याने वीरमाता बनुबाई धुरगुडे यांना स्वत:सोबत दवाखान्यात येण्याबाबत सहायक पोलीस निरीक्षक पवार यांनी विनंती केली. त्यांच्या या आस्थेवाईकपणामुळे बनुबाई या पवार यांच्या गळ्यात पडून रडल्या. ‘माझ्या पोरावाणीच माझी चौकशी करतुयास,’ असे म्हणत बापूसाहेबांच्या आठवणी जागविल्या. यावेळी पवार यांनी सोबत आणलेली फळेही त्यांना दिली. भुर्इंज पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीची परिसरात चर्चा होत आहे.