शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

पोलोसाठी अडीच कोटींची गरज

By admin | Updated: February 11, 2016 00:34 IST

जिल्हाधिकाऱ्यांची मागणी : पुणे येथील बैठकीत मैदानाच्या विकासाबद्दल माहिती

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील पोलो खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी शासनस्तरावरून २ कोटी ५३ लाख रुपये निधी उपलब्ध होण्याची विनंती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केली आहे. पुणे येथील विधानभवनात विभागातील जिल्हानिहाय जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारूप आराखडा २०१६-१७ राज्यस्तरीय बैठकीअंतर्गत सातारा जिल्ह्याच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ही विनंती केली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, मंत्री गिरीश बापट, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, महादेव जानकर, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, वित्त विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी मुदगल म्हणाले, ‘सातारा जिल्हा वार्षिक योजनेचा २०१६-१७ साठी प्रारूप आराखडा एकूण २११ कोटी १० लाख रुपयांचा आहे. १४९ कोटी ४७ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी या आराखड्याात करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी रोप निर्मितीसाठी ३६ लाख रुपये तर १०० हरितगृह उभारणीसाठी २६ कोटी रुपये अशी शासनस्तरावरून अतिरिक्त तरतूद करावी. त्याचबरोबर महाबळेश्वर येथील पोलो खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी शासनस्तरावरून २ कोटी ५३ लाख रुपये निधी उपलब्ध व्हावा. जिल्हा परिषदच्या शाळांसाठी डिजिटल आणि वर्च्युअल क्लासरुम नावीन्यपूर्ण योजनेतून करण्यात येणार आहे.’ असल्याचेही त्यांनी संगणकीय सादरीकरणाच्या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)