शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्राच्या आधारे राजकीय लाभ

By admin | Updated: June 6, 2016 00:41 IST

तक्रार : पाचगणीच्या नगराध्यक्षांवर गुन्हा

पाचगणी : पाचगणी नगराध्यक्षा लक्ष्मी राजेंद्र कऱ्हाडकर यांनी बनावट कागदपत्रे सादर करून तीनवेळा नगराध्यक्षपद मिळवत शासनाची फसवणूक केल्याबद्दलचा गुन्हा दीपक कांबळे यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.पाचगणी पोलिस स्टेशनमधून मिळालेली माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी पाचगणीच्या नगराध्यक्षपदी कऱ्हाडकर यांची निवड झाली. कऱ्हाडकर यांनी इतर मागास प्रवर्गातून अर्ज भरला होता. परंतु त्यांचे लग्नापूर्वीचे नाव मोनीषा हदी राजबल्ली असे असून, त्या मुस्लीम समाजाच्या आहेत. तो समाज इतर मागास प्रवर्गामध्ये समाविष्ट नाही. असे असताना त्यांनी जयहिंद महाविद्यालय चर्चगेट (मुंबई) या महाविद्यालयातून १९८८ मध्ये शाळा सोडल्याचा दाखला घेतला आहे. या दाखल्यावर त्यांचा ‘इस्लाम’ असा जातीचा उल्लेख नमूद केला आहे. २००१ मध्ये जनतेतून थेट नगराध्यक्ष पदाची निवड ओबीसी राखीव होती. ही निवडणूक लढविण्यासाठी व आरक्षित जागेचा फायदा घेण्यासाठी शाळेच्या दाखल्याचा गैरवापर करून जातीच्या दाखल्यासाठी त्याचा पुरावा म्हणून उपयोग कऱ्हाडकर यांनी केला आहे. या जातीच्या दाखल्यावरून त्यांनी २००१, २००६ आणि २०१४ अशी नगरसेवक व नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि पद मिळविले. कऱ्हाडकर यांनी राजकीय लाभ घेण्यासाठी शासनाची व जनतेची फसवणूक केली असल्याचे फिर्यादित दीपक कांबळे यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)‘राजकीय आकसापोटी आणि नजीकच्या काळात येऊ घातलेल्या पाचगणी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेले हे षड्यंत्र आहे. या अगोदर मागील निवडणुकांच्या वेळी कागदपत्रांची पडताळणी झाली आहे. मी निर्दोष असून, न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. हा केवळ राजकीय स्टंट असून, पाचगणीतील सुज्ञ जनतेला अशा तक्रारी का केल्या जातात हे ज्ञात आहे.’ - लक्ष्मी कऱ्हाडकर, नगराध्यक्षा