शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

तळ्यात विसर्जन करणाऱ्यांची थेट पोलिस ठाण्यात वरात

By admin | Updated: September 11, 2016 00:24 IST

मंगळवार तळ्यावर राडा : संध्याकाळनंतर बाप्पांचे शांततेत विसर्जन

सातारा : विसर्जनासाठी प्रतिबंधित असलेल्या मंगळवार तळ्यातच विसर्जन करणार असा आग्रह करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुनील कोळेकर यांना पोलिसांनी अटकाव करत थेट पोलिस ठाणे दाखवले. काही काळ तणाव निर्माण झाल्यानंतर तळ्याशेजारी पालिकेच्या वतीने ठेवण्यात आलेल्या हौदात नागरिकांनी गणपती बाप्पांचे विसर्जन केले.गतवर्षी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मंगळवार तळ्यात गणपती विसर्जनावर बंदी आणली होती. न्यायालयाची ही बंदी झुगारून परिसरातील काही नागरिकांनी तळ्यातच गणपती विसर्जनाचा हट्ट धरला. त्यांना अटकाव करण्याचाही यावेळी प्रयत्न करण्यात आला. प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी त्यांनी गणपतीची मूर्ती रस्त्यावरच ठेवून विसर्जनाची परवानगी देण्याचा आग्रह धरला. काही वेळाने या मूर्ती घेऊन संबंधित लोक मंगळवार तळे परिसरातून इतरत्र निघून गेले.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपा शहराध्यक्ष सुनील कोळेकर येथे दाखल झाले. यावेळी पोलिसांबरोबर कोळेकर यांची शाब्दिक खडाजंगी झाली. ‘कोणत्या कायद्याने तुम्ही आम्हाला आडवता, आम्हाला आमच्या पद्धतीने सण साजरे करू द्या,’ अशी मागणी त्यांनी केली. जोरदार वादावादी आणि धक्काबुक्कीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. त्यानंतर कोळेकर यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले.दरम्यान, तळे परिसरात झालेल्या या तणावपूर्ण प्रकारामुळे परिसरात याची जोरदार चर्चा सुरू होती. तळे परिसरात पाण्याने भरलेले चार हौद पालिकेच्या वतीने ठेवण्यात आले होते. हा प्रकार घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी संध्याकाळी उशिरापर्यंत भक्तिपूर्ण वातावरणात शांततेत तळे परिसरात गणपती विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तळे परिसरात तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)तळ्यात विसर्जन... न्यायालयाचा अवमानमंगळवार तळ्यात गणपती विसर्जनाला बंदी आणण्यात यावी यासाठी गतवर्षी आरटीआय कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने तळ्यात विसर्जनाला बंदी घातली होती व त्याविषयीची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने करावी, असे निर्देश दिले होते. तळ्यात कोणीही कोणत्याही कारणाने गणपती विसर्जन केले तर तो न्यायालयाचा अवमान होईल, असेही या निकालात नमूद करण्यात आले आहे.