शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यास सुनावली पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 02:31 IST

पैसे उकळले; शिफ्टिंग खर्चाची खोटी बिले दाखविली

सातारा : लोकमत कर्मचाºयाने बदली झालेल्या ठिकाणी सामान घेऊन जाण्यासाठी शिफ्टिंग खर्चाचे खोटे बिल सादर करून ‘लोकमत’कडून जास्तीची रक्कम उकळल्याचे उघडकीस आले. या प्रकारानंतर ‘लोकमत’च्या प्रशासन विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर सातारा शहर पोलिसांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन संबंधित कर्मचाºयाला अटक केली. त्याला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.भगीरथ शंकर वाणी (वय ५५, सध्या रा. सोमवार पेठ, सातारा, मूळ रा. शिवकॉलनी, आनंद एसटीडी लाईनजवळ, जळगाव) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील ‘लोकमत’च्या कार्यालयामध्ये भगीरथ वाणी हा कार्यरत होता. त्याची सावंतवाडीहून सातारा लोकमत कार्यालयात बदली झाली होती. या बदलीनंतरचा शिफ्टिंगचा खर्च वास्तवापेक्षा जास्तीचा दाखवून कंपनीकडून जास्तीचे पैसे उकळले. परंतु, या बिलाबाबत शंका आल्याने कोल्हापूर येथील ‘लोकमत’चे व्यवस्थापक मनुष्यबळ व प्रशासनाचे संतोष साखरे यांनी चौकशी केली असता वाणी याने संबंधित टॅव्हल्स कंपनीकडून कोरे बिल घेतले. त्यावर वास्तव रकमेपेक्षा जास्तीची रक्कम लिहून जास्तीचे पैसे उकळले व लोकमतची फसवणूक केल्याचे दिसून आले.या प्रकारानंतर वरिष्ठ सरव्यस्थापक मकरंद देशमुख यांनी कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात भगीरथ वाणी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. हा सारा प्रकार साताऱ्यात घडल्यामुळे हा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. शहर पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन वाणी याला अटक केली. बुधवारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी