शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

पोलीस ठाण्याबाहेर तीन ट्रक पेटवले

By admin | Updated: October 25, 2015 23:48 IST

कवठेमहांकाळची घटना : वाळूच्या दोन ट्रकचा समावेश

३० एप्रिल १९०९ च्या सूर्योदयापूर्वी ५ वाजून १५ मिनीटांनी या दैवी गुणसंपन्न बालकाचा जन्म झाला. त्याचवेळी वरखेड क्षेत्री एक घटना घडली. विदेही मूर्ती आडकोजी अलिकडे आपलं स्थान सोडून सहसा कोठे जाईनात पण त्या दिवशी अगदी सकाळी हा अवलिया महत्मा रोमरोमी हर्षाने फुलला. ते जेथे पहुडले होते तेथून उठले व पाच-सहा घरांपलीकडच्या तुकाराम बुवा वानखडे यांचेकडे आलेत. दार ठोठावू लागले व ‘माहा आंबा दे, माहा आंबा दे!’ म्हणत ठाण मांडून बसलेत. तेवढ्यात आजुबाजूचे लोक तेथे आले. तुकाराम बुवांनी घरातून पाच आंबे आणलेत. बाकी लोकही आंबे आणून त्यांच्या पुढ्यात ठेवू लागले. पण त्यातील एकाही आंब्याला ते हात लावेनात. तुकाराम बुवाचा हात पकडून ‘माहा आंबा दे!’ असे पुन्हा पुन्हा हट्टाने म्हणून लागले. तुकारामजीच्या पत्नी बजावार्इंना आठवण झाली की, आडकोजी महाराजांनी मंजुळेच्या तोंडात आंबा पिळला होता. ती गर्भार आहे. तेव्हा यावलीला जावून पहा. बजाबाईच्या या सूचनेवरुन तुकारामबुवाला सर्व अर्थ उलगडला. त्यांनी समर्थांना नमस्कार केला व तडक यावलीचा रस्ता धरला. यावलीला येवून पहातात तर मंजुळेच्या झोपडीजवळ देशमुखांच्या वाड्यात मंगलवाद्य वाजत होती. बजाबाईचा अंदाज खरा ठरला होता. त्यांना ‘माहा आंबा दे!’ चा अर्थ कळला; पण या एक दिवसाच्या मुलाला महाराजांजवळ नेणे शक्य नाही. म्हणून तुकारामबुवा त्वरित वरखेडला गेले. त्यांनी श्री सदगुरु आडकोजीचे पाय धरले व म्हणाले ‘बाबा! तुमचा आंबा थोड्याच दिवसात आणून देतो.’ समर्थांच्या मुखावर स्मित झळकलं; पण रोज केव्हा तरी त्यांच्या दारात येवून ‘माहा आंबा दे!’ असा आलख जागवायला मात्र ते विसरले नाहीत. महाराजांनी आपल्या ‘माझी आत्मकथा’ मध्ये म्हटले आहे - तुकड्यादास म्हणे नवसे मी झाले। प्रसादे लाभलो निधनाच्या।।पुत्र जन्माच्या दिवशीच बंडोजीची झोपडी उडाली. त्यामुळे गावकऱ्यांनी बंडोजीला हिंमत देवून शोजाऱ्यापाजाऱ्यांनी श्रमदान करुन चार-आठ दिवसांत बंडोजीची झोपडी पूर्ववत उभी केली. झोपडी नीट होताच तानाबाईनी नातवाला घरी आणलं.११ मे १९०९ ला बाळ बारा दिवसांचा झाला. बारव्या दिवशी बाळाचे नामकरण संस्कार करावयाचे ठरले. पण बारशाला काय करणार, या विचारात असतानाच आकोटचे श्रीहरीबुवा सरळ यावलीला बंडोजीच्या घरी आले. त्यावेळी प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यावलीलाच होते. अचानकपणे ते दोघेही एकाचवेळी अनाहुतपणे बंडोजीच्या घरी आले. गावच्या लोकांनी बारशाच्या सोहळ्यासाठी गढ्या तोरणांनी झोपडी सुशोभित केली होती. दारात मंगलवाद्ये वाजत होती. त्यावेळी हे दोघेही दाराजवळ आले. दोघांनाही एकदम आलेले पाहून लोकांना आश्चर्य वाटले. बंडोजींनी त्यांचे स्वागत केले. दोघेही म्हणतात - ‘मंजुळाबाई! आमच्या बाळाला बघू दे!’ असे म्हणून ते झोपडीत शिरले. मंजुळाबाई आपलं बाळ त्याच्या पायावर घालण्याच्या प्रयत्नात असतांनाच हरीबुवांनी बाळ मोठ्या घाईने आपल्या हातावर घेतलं व म्हणाले, ‘बाई! कोणाच्याही पायावर नोको ठुत जावू या लेकराले, याच्याच पायावर जमाना डोकं ठेविन’ आणि हरीबुवा त्या बालकाशी काही बोलू लागले. त्याच वेळी गुलाबराव महाराज म्हणाले ‘सवाष्णीनों! बाळाला पाळण्यात घाला व मंगल गाणी गा’ दोन दोन महात्मे तिथे असल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली’ त्यांची वाचाच कुंठित झाली. हरीबुवांनी स्वत:च बाळाला पाळ्यात घातले. संत गुलाबराव महाराजांनी बाळाच्या अंगावरुन हात फिरविला. सहज वाणीतून त्यांनी मंगलगीत गायलं. त्यांनी स्वयंस्फूर्त पाळणा गायला सुरुवात केली. पाळण्यानंतर त्या संत द्वयांनी ‘माणिक देव - माणिक देव’ असा उद्घोष केला आणि दोघांनीही पाळणा हलविला. झोके देवू लागले. हा अपूर्व नामकरण विधी डोळे भरुन पाहण्यासाठी शेकडो महिला पुरुष मिळेल त्या जागी अंगणात, रस्त्यावर उभे होते. तानाबाईच्या व बंडोजीच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहत होते. मंजूळा तर जणू प्रभू स्मरणातच निमग्न होती. ‘मंजुळा तुझा बाळा भाग्यवान आहे बाई!’ असा उच्चार करीतच शेजारणी घरी गेल्यात. महाराजांनी ‘माझी आत्मकथा’ मध्ये हा प्रसंग वर्णिला आहे. आकोट ग्रामीचे हरीबुवा सिध्दा देती आशिर्वाद तान्हपणी।। संत गुलाबराव माधान गावीचे । आशिर्वाद त्यांचे बालकाशी।।- बाबा आवारे