शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलाने शोधून दिले हरवलेले पाकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:10 IST

कुकुडवाड : रताळे, कोथिंबीर विकणाऱ्या महिलेचे दागिने आणि रोकड ठेवलेले पाकीट हरवले. काबाडकष्ट करून जमविलेले दागिने, रोकड असलेले पाकीट ...

कुकुडवाड : रताळे, कोथिंबीर विकणाऱ्या महिलेचे दागिने आणि रोकड ठेवलेले पाकीट हरवले. काबाडकष्ट करून जमविलेले दागिने, रोकड असलेले पाकीट सापडत नसल्याने त्या मोठमोठ्याने रडत होत्या. हे समजल्यावर पोलीसपाटील अर्जुन काटकर यांनी चौकशी करत पाकीट शोधून दिले.

पुकळेवाडी येथील एक महिला शेतिमाल विकण्यासाठी कुकुडवाड येथे आल्या होत्या. गावात फिरून भाजीपाला विकत असताना त्यांच्याजवळ असणारे पैशाचे पाकीट कुठेतरी पडल्याचे जाणवले अन्‌ त्यांच्या काळजात धस्स झाले. काटकसर करून संसारात जोडलेले दीड तोळे सोन्याचे दागिने व अडीच हजार रुपयांची रोकड या पाकिटात होती. पाकीट पडल्याचे लक्षात आल्यावर त्या मोठमोठ्याने रडायला लागल्या. गावभर फिरून रताळे व कोथिंबीर विकत असताना पडलेले पाकीट नेमके कुठे पडले व ते सापडेल की नाही, याचा विचार करत त्या गावात एके ठिकाणी रडत असल्याचे पोलीसपाटील स्वयंसेवक व शिवशक्ती कला, नाट्य, सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष अर्जुन काटकर यांच्या नजरेस पडले. काटकर यांनी त्या महिलेची विचारपूस करत शांत केले. अत्यंत जिद्दीने व कसून तब्बल दीड तास चौकशी करत काटकर यांनी या महिलेच्या पाकिटाचा तपास लावला. या पाकिटामध्ये असलेली रक्कम व दागिने याची खातरजमा करून ते त्या महिलेकडे सुपूर्त केले.