शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

ढेबेवाडी विभागातील अवैध व्यवसायांना पोलिसांचा चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST

ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र काढणे गावापासून पश्चिमेला शिराळा हद्दीपर्यंत पसरले आहे. जंगल आणि दऱ्या-खोऱ्यात विखुरलेल्या या विभागातील ग्रामस्थ ...

ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र काढणे गावापासून पश्चिमेला शिराळा हद्दीपर्यंत पसरले आहे. जंगल आणि दऱ्या-खोऱ्यात विखुरलेल्या या विभागातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात व्यवसाय आणि नोकरीसाठी शहराकडे स्थंलातरित होत आहेत. याच विभागात वांग मराठवाडी धरणग्रस्तांची आंदोलने, तर पवनचक्की कंपनीच्या दलालांची व गुंडांची दादागिरी सुरू असते. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत त्यांनी माजवलेली दहशत व गटातटाच्या राजकारणामुळे हा विभाग कायमच चर्चेत राहिला आहे.

गत अडीच वर्षात ढेबेवाडी विभागात अवैध व्यवसायांची विषवल्ली पसरली होती. पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील परिसर वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे दहशतीखाली होता. रोडरोमिओंपासून ते गल्लीतील दादांची दहशत येथे पाय पसरू लागली होती. दोन वर्षांपूर्वी करपेवाडी येथील शाळकरी मुलीचा गळा चिरून खून झाला होता. मात्र तिचे मारेकरी पकडण्यात पोलिसांना अपयश आले. खळे येथे शाळेला येणाऱ्या मुलीवर हल्ला झाला होता, तर काही महिन्यांपूर्वी चोरट्यांनी ढेबेवाडी बाजारपेठेतील दुकाने लक्ष्य केली होती. त्या घटनेमुळे संपूर्ण ढेबेवाडी परिसर हादरला होता. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना नाहक त्रास दिल्याचा आरोपही ग्रामस्थ करत होते. याशिवाय लॉंकडाऊनमध्ये भागात दारू मोठ्या प्रमाणात आली होती. शिराळ्याकडून येणाऱ्या दारूच्या कारवाईमागील गौडबंगालाचीही मोठी चर्चा होती. त्यावेळी ढेबेवाडी पोलीस गांधारीच्या भूमिकेत होते.

सध्या नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनीही अवैध व्यवसायांची ही विषवल्ली मुळापासून उखडून टाकण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारताच ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. त्यातच पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध केल्या. त्यातूनही अवैध व्यवसायांना चाप लावण्यासाठी कारवायांचा धडाका सुरू केला.

- चौकट

गत दोन वर्षांपासून उसाचे ट्रक व ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभे केले जायचे. त्यांच्यावर कारवाई करण्यास यापूर्वी पोलीस धजावत नव्हते. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे अपघातही घडले. अखेर रस्त्यानजीक ट्रॅक्टर-ट्रॉली धोकादायक स्थितीत उभ्या करणाऱ्यांवर सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असून, अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे.

- चौकट

ग्रामपंचायत निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच अवैध व्यवसाय करणाऱ्या व अशा व्यवसायांना पाठीशी घालणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार आहोत. विभागात कायदा, सुव्यवस्था रहावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- संतोष पवार

सहायक पोलीस निरीक्षक, ढेबेवाडी