शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

कालव्याजवळ पाट... ... धरणाजवळ सपाट !

By admin | Updated: August 24, 2014 22:40 IST

तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष : मातीच्या कॅनॉलवर जागोजागी झुडपे

कालव्याजवळ पाट... ... धरणाजवळ सपाट !तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष : मातीच्या कॅनॉलवर जागोजागी झुडपेपरळी : विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने उरमोडीच्या पाण्याने पेट घेतला आहे. प्रत्येक पक्षाचे लोकप्रतिनिधीचे आश्वासन उरमोडीचे पाणी घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. यासर्व धुमशानीत उरमोडीच्या तांत्रिक बाबींकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. पाणी जोड कालव्यास सोडताना तांत्रिक कामे तशीच राहून गेली आहेत. त्यामुळे ‘पुढे पाठ, मागे सपाट’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.दुष्काळी तालुके अजूनही पाण्यासाठी तहानलेले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी उरमोडी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मात्र मूळ उद्देश बाजूला राहून उरमोडीच्या पाण्याने वेगळेच वळण घेतल्याने या पाण्यावरून श्रेयवाद झाले होेत. दोन वर्षांपूर्वी उरमोडी प्रकल्पातून कण्हेर जोड कालव्यात सोडण्यात आले. यावेळी जोड कालव्याचे बरेचसे काम बाकी होते.मात्र, तेव्हापासून आजपर्यंत हा कॅनॉल मातीचाच राहिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅनॉलच्या प्रकल्पानजीक असलेल्या नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी केलेल्या गेटला आजतागायत वॉल, दरवाजा बसविण्यात आला नाही.उरमोडी धरणाच्या भिंतीलगत असणारा कॅनॉल अजूनही मातीचाच आहे. ४०० क्सुसेक पाण्याचा विसर्ग हे मातीचे कॅनॉल पाण्याचे प्रवाह रोखणार का? या कॅनॉलवर जागोजागी झुडपे उगवली आहेत. अजूनही कॅनॉलचे कामे अपूर्ण आहेत. माण तालुक्यात पाणी नेण्यासाठी कालवा नाही. माण-खटाव तालुक्यांला प्रत्येक ३.२८ अब्ज फुटांचे पाण्याचे वाटप झाले. मात्र, सातारा तालुक्यातील कॅनॉलची कामे अजूनही कागदावरच प्रगतिपथावर आहेत. उरमोडी उपसा योजनेअंतर्गत वाठार किरोली व कोंबडवाडी येथून ४५० फूट पाणी उलचून नेणाऱ्या लाईट बिलाचे घोंगडे अजूनही भिजत आहे. या लाईट बिलाच्या महिन्याचा खर्च ६० लाख आहे. जिल्हा नियोजनामधून दुष्काळी स्थितीतच पाणी बिले करण्याची तरतूद आहे. मग इतर वेळी पाणी उचलून न्यायचे म्हटल्यास त्याचा बोजा उचलणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)भिंतीलगत असणारा कॅनॉल मातीचाउरमोडी धरणाच्या भिंतीलगत असणारा कॅनॉल अजूनही मातीचाच आहे. या कॅनॉलवर सर्वत्र झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परंतु संबंधित ठेकेदाराने पूर्ण केलेले काम आणि त्याला काँक्रीटचे अदा केले आहे. तरीही अजून कालव्याची कामे अपूर्णच आहे. धरण प्रशासनाची दिवाळखोरीउरमोडी जोड कालव्यापासून पाणी सोडण्यात आल्याने अडीच वर्षांत पहिल्यांदाच गेट बंद करण्यात आले आहे. मात्र, हे गेट सिमेंट काँक्रीटमध्ये बांधण्यात आले आहे. उन्हाळ्यात नदीकाठच्या गावांना पाणी सोडायचे झाल्यास त्या गेटचे काँक्रीट पुन्हा फोडायला लागणार आहे. प्रकल्पाच्या गेटला दरवाजा नसणे ही धरण प्रशासनाची दिवाळखोरीच समजली जात आहे.