शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST

कऱ्हाड : शहरातील मुख्य चौकासह अंतर्गत पेठेतील नाल्यांमध्ये प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. गत काही दिवसांपासून प्लास्टिक कचरा गटरमध्ये ...

कऱ्हाड : शहरातील मुख्य चौकासह अंतर्गत पेठेतील नाल्यांमध्ये प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. गत काही दिवसांपासून प्लास्टिक कचरा गटरमध्ये तसाच साचून राहत आहे. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. स्वच्छता कर्मचारी कचरा हटवितात. मात्र, काही दिवसांत कचऱ्याचे प्रमाण वाढते. या कचऱ्यामुळे दुर्गंधी वाढत आहे.

रस्त्यावर खड्डे

पाटण : तारळे-घोट रस्त्यावर कदम हॉस्पिटलपर्यंत रस्त्यावर खड्डयांमुळे चाळण निर्माण झाली आहे. सुमारे एक ते दीड फूट खोलीच्या या खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे, तर प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या डागडुजीची मागणी केली जात आहे.

बिबट्याची दहशत (फोटो : १४इन्फोबॉक्स०२)

तांबवे : परिसरातील शिवारामध्ये सध्या बिबट्याची दहशत आहे. ग्रामस्थांना काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते, तसेच नजीकच्या शिवारातही बिबट्याने शेतकऱ्याला दर्शन दिले. त्यामुळे शिवारात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत. विभागातील अनेक गावांमध्ये वारंवार बिबट्या आढळून येत आहे. तसेच पाळीव जनावरांवरही त्याच्याकडून हल्ले होत आहेत.

झुडपे विस्तारली

तांबवे : उत्तर तांबवे ते आरेवाडी दरम्यान रस्त्याकडेला अनेक ठिकाणी झाडवेली वाढली आहेत. त्यामुळे ती अपघातास निमंत्रण देणारी ठरू लागली आहेत. उत्तर तांबवेतून आरेवाडी, गमेवाडी, डेळेवाडीला जाण्यास रस्ता आहे. या रस्त्यानजीक झुडपे वाढली आहेत. ही झुडपे हटविण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.