शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण गरजेचे

By admin | Updated: May 12, 2016 23:55 IST

वेदांतिकाराजे भोसले : कर्तव्य सोशल ग्रुपच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

सातारा : ‘जागतिक तापमान वाढ, पर्जन्यमानात घट, गारपीट, अतिवृष्टी, भीषण दुष्काळ यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपतर्फे वृक्षलागवड मोहित राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी व्हावे,’ असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. वेदांतिकाराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दुष्काळामुळे भीषण पाणी टंचाई भेडसावत आहे. तीव्र उन्हाळा आणि पाणीटंचाईमुळे मानवासह पशु पक्ष्यांनाही संकटाचा सामना करावा लागत आहे. निसर्गाचा समतोल ढासळल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. बिकट परिस्थितीपासून वाचण्यासाठी पर्यावरण रक्षण आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन हाच एकमेव पर्याय आहे. त्याबरोबरच कचरा निर्मूलनही महत्त्वाचे आहे. कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून निसर्ग रक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवण्यात येत आहेत. वेळोवेळी वृक्षारोपण करण्यात आले आहे. कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून समाज मंदिर, खुल्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. झाडे लावल्यानंतर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी मोहिमेत सहभागी होणाऱ्यांनी पार पाडणे आवश्यक आहे. यासाठी कर्तव्य सोशल ग्रुप सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. भीषण दुष्काळाला आपणच जबाबदार आहोत. यातून आपणच मार्ग काढून दुष्काळावर मात करण्यासाठी निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. त्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्यासाठी अमर मोकाशी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)दुष्काळाचे संकट पुन्हा ओढावू नये, अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. मात्र, मी एकटा काय करणार, अशा भावनेने ही इच्छा मनातच राहून जाते. तोच प्रकार कचऱ्याच्याबाबतीतही होतो. कोणीतरी कचरा रस्त्यावर, ओढ्यात टाकताना आपण पाहतो. त्याचा रागही येतो. हे सर्व थांबावे, अशीच इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. इच्छेला मनात न ठेवता प्रत्यक्ष कृतीची जोड देण्याची नितांत गरज आहे. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि कचरा निर्मूलनाची सुप्त इच्छा प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण करण्याची वेळ आली आहे. सर्वांनीच सामाजिक जबाबदारी म्हणून सकारात्मक पाऊल उचलले पाहिजे. येत्या जून महिन्यापासून कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून निसर्ग रक्षणासाठी वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेत एकट्याने किंंवा ग्रुपने, विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे, बचत गट, शाळा-महाविद्यालयांनी सहभागी होणे आवश्यक आहे.