शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

वडिलांच्या रक्षाविसर्जनाऐवजी वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2015 01:05 IST

स्मृती राहणार चिरंतन : बेलवडे बुद्रुकच्या मोहिते कुटुंबीयांनी पाडला नवा पायंडा -गूड न्यूज

कऱ्हाड : वडिलांच्या स्मृती कायम जपण्यासाठी बेलवडे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील मोहिते कुटुंबीयांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर रक्षा व अस्थींचे पाण्यात विसर्जन न करता स्मशानभूमीतील परिसरातच खड्डा खणून वृक्षारोपण केले. या झाडाला रक्षा व अस्थी घालून वृक्षारोपण केले. आणि आपल्या वडिलांच्या स्मृती कायम राखण्याचा नवा उपक्रम राबवून प्रत्येकाने रक्षा विसर्जन पाण्यात करून प्रदूषण करण्यापेक्षा वृक्षारोपण करून त्यांच्या स्मृती वृक्षारोपनातून जागवण्याचा संदेश दिलाआहे.सर्वसामान्य कुटुंबातील कृष्णा मोहिते यांचे सहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. दरम्यान, त्यांचे दोन मुले आत्माराम मोहिते व सतीश मोहिते यांनी इस्लामपूर येथील सर्जेराव यादव प्रतिष्ठानच्या आवाहनाचा विचार करून आपल्या वडिलांची रक्षा विसर्जित न करता वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला.बेलवडे येथील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि मोहिते कुटुंबीयांनी हा आदर्शवत उपक्रम राबविला. देशात ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश घरोघरी पोहोचवला जातो; पण त्यास प्रतिसाद कमी मिळत आहे. अनेक अडचणीही येत आहेत. पण स्मशानभूमीमध्ये रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम घेतल्यानंतर त्या रक्षाचे पाण्यात विसर्जन केल्याने प्रदूषण वाढेल; पण वृक्षारोपण केल्यास आपल्या माणसांच्या स्मृती जोपर्यंत ते झाड आहे, तोपर्यंत राहतील, असा या उपक्रमाचा हेतू आहे. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी राबविला तर आपल्या माणसांच्या स्मृती जागविता येतीलच शिवाय पर्यावरणाचेही रक्षण होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)