शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना एक जागा; सत्ताधाऱ्यांचे पॅनेल तयार..

By admin | Updated: May 11, 2016 00:12 IST

२० उमेदवारांची यादी जाहीर : निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरूच--सांगा, जनता बँक कोणाची.. ?

सातारा : जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी विरोधकांना एक जागा सोडून सत्ताधाऱ्यांनी २० उमेदवारांचे पॅनेल जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी विरोधकांना पूर्ण पॅनेल उभे करण्याइतपत उमेदवारच शिल्लक राहिले नसल्याचा दावा सत्ताधारी भागधारक पॅनेलचे प्रमुख अ‍ॅड. मुकुंद सारडा व विनोद कुलकर्णी यांनी केला आहे. विरोधकांकडून निवडणूक लादण्याचा प्रयत्न होत असला तरी शेवटपर्यंत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सर्वसाधारण गटातून विनोद कुलकर्णी, अमोल मोहिते, जयवंत भोसले, माधव सारडा, आनंदराव कणसे, जयेंद्र चव्हाण, अतुल जाधव, चंद्रशेखर घोडके, अरुणकुमार यादव, रामचंद्र साठे, अविनाश बाचल, रवींद्र माने, सागर लाहोटी, वजीर नदाफ, बाळासाहेब ऊर्फ नारायण लोहार यांची तर महिला राखीवमधून चेतना माजगावकर, सुजाता राजेमहाडिक, अनुसूचित जाती-जमातीमधून विजय बडेकर, इतर मागास प्रवर्गातून अशोक मोने, भटक्या विमुक्त जाती-जमातीमधून बाळासाहेब गोसावी यांना भागधारक पॅनेलतर्फे संधी देण्यात आली आहे. दि. २ जून रोजी जनता सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून या निवडणुकीचे पडघम सातारा शहर व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये वाजू लागले आहेत. हळूहळू निवडणुकीचे वातावरणही तापू लागले आहे. सध्या तरी गेल्या सहा महिन्यांपासून या बँकेतील काही विषय कोर्ट कचेऱ्यांमध्ये जाऊ लागले आहेत. बँकेला उभे राहिलेल्या २७ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले होते, त्यापैकी १८ जणांनी उपनिबंधकांकडे केलेले अपीलही फेटाळण्यात आल्याने त्यांची न्यायालयात जाण्याची तयारी सुरू आहे, या पार्श्वभूमीवर भागधारक पॅनेलचे प्रमुख अ‍ॅड. मुकुंद सारडा, चेअरमन विनोद कुलकर्णी, संस्थापक सदस्य बाळासाहेब जाजू, भास्करराव शालगर या चार पॅनेल प्रमुखांनी मंगळवारी भागधारक पॅनेलच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. निवडणुकीबाबत बँकेचा जो ५० लाखांचा खर्च होणार आहे, तो खर्च वाचावा आणि बँकेवर निवडणूक खर्चाचा अतिरिक्त बोजा पडू नये, म्हणून ही बिनविरोध करण्याचे आवाहन सत्ताधाऱ्यांनी केले होते; परंतु विरोधकांनी हे आवाहन धुडकावून लावले आहे. सध्याच्या या परिस्थितीत नाराज मंडळी एकत्रित येऊन पॅनेल उभे करण्याच्या तयारीला लागली आहेत. आता सत्ताधाऱ्यांसमोर तुल्यबळ उमेदवारांचे पॅनेल उभे राहणार का? हे औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी) खर्च वाचावा ही भूमिका...विरोधकांकडे उमेदवारच नसल्याने त्यांची आत्ताच दमछाक झालेली आहे. निवडणुकीसाठी लागणारा ५० लाखांचा खर्च वाचावा, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यासाठी प्रयत्न करणार आहे.- अ‍ॅड. मुकुंद सारडा, भागधारक पॅनेल प्रमुख