शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

फलटणकरांनी आमच्या मतदारसंघात लुडबूड करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 00:33 IST

जयकुमार गोरे : येलमरवाडीत विविध विकासकामांचे उद्घाटन

कातरखटाव : ‘गावचा सरपंच असो, अथवा तालुक्याचा आमदार. विकासकामे दिसून येत नसतील तर जनतेने त्यांना घरी बसवलं पाहिजे. स्वाभिमानाने जगण्यासाठी माण-खटावचा विकास झाला पाहिजे. काही नेत्यांनी फक्त दुष्काळ हटला पाहिजे, पाणी प्रश्न मिटला पाहिजे, या आश्वासनांशिवाय या भागात काहीही दिलं नाही. पंचवीस वर्षांत विरोधकांनी काय दिवे लावले. फलटणच्या लोकांनी आमच्या मतदारसंघात लुडबुड करू नये. हिम्मत असेल तर विकासकामांचे बोला.’ अशी खरमरीत टीका आमदार जयकुमार गोरे यांनी केली.खटाव तालुक्यातील येलमरवाडी येथे सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांच्या सत्कार, पुलाजवळील सिंमेट बंधारा, नवीन ग्रामपंचायत कार्यालय, शिंगाडे वस्ती पाईपलाईन, तळेकर वस्ती पाईपलाईन यासह विविध कामांच्या उद्घाटप्रसंगी ते बोलत होते.आ. गोरे म्हणाले, ‘यलमरवाडी गावच्या विकासात युवा पिढीचं योगदान दिसून येत आहे. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत एकाही आमदाराला गावचा रस्ता करता आला नाही. गावात साधी एसटी बस सुद्धा आणता आली नाही; परंतु आज येथील युवकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे येलमरवाडी गावचा कायापालट होत चालला आहे. संपूर्ण अडगळीच्या रस्त्यांचे डांबरीकरण होत चालले आहे. माण-खटाव तालुक्यांतील प्रत्येक गावचा कारभारी चांगला पाहिजे. मग तो सरपंच असो, वा आमदार. विकासकामाकडे दुर्लक्ष केलं तर त्यांना घरी बसवा. कार्यक्रमास निमसोडचे काकासो मोरे, रामभाऊ देवकर-पाटील, राजू निकम, विशाल बागल, सरपंच प्रसाद बागल, उपसरपंच नवनाथ शिंगाडे, तात्यासो शिंगाडे, सोसायटी अध्यक्ष विजय बागल, उपाध्यक्ष दत्ता केंगार, संचालक वसंतराव बागल, मधुकर तळेकर, सुमल बागल, सुरेश बागल, हणमंत बागल, भरत बागल, विठ्ठल बागल आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसाद बागल यांनी सूत्रसंचालन केले. दादासो बागल यांनी आभार मानले. (वार्ताहर)