शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

फलटणवासियांनी वाढीव घरपट्टी बिले भरु नये : अशोकराव जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST

फलटण : फलटण नगर परिषदेने शहरातील नागरिकांना वाढीव घरपट्टी बिले दिली असून, ती नागरिकांनी भरू नयेत, असे आवाहन नगरसेवक ...

फलटण : फलटण नगर परिषदेने शहरातील नागरिकांना वाढीव घरपट्टी बिले दिली असून, ती नागरिकांनी भरू नयेत, असे आवाहन नगरसेवक अशोकराव जाधव यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

फलटण नगर परिषदेने दोन वर्षांपूर्वी अमरावतीच्या कंपनीकडून फलटण शहरातील घरे व व्यापारी गाळ्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यावेळी नगर परिषदेने घरपट्टीच्या दरात जवळजवळ तीन पटीने वाढ केलेली होती. या वाढीव घरपट्टीविरोधात फलटण तालुका कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, विरोधी पक्षनेते समशेर नाईक-निंबाळकर, गटनेते अशोकराव जाधव यांनी सर्वपक्षीय आंदोलन उभे केले होते. त्या आंदोलनाला यश मिळून अमरावतीच्या कंपनीकडील सर्वेक्षण रद्द ठरवून घरपट्टी कमी करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले होते.

वास्तविक सुनावणी झाली; परंतु त्याचा कोणताही निकाल न देताच नगर परिषदेने फलटणमधील नागरिकांना वाढीव रकमेची घरपट्टी बिले पुन्हा पाठवली आहेत. त्यामुळे फलटणमधील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी जुनी व कमी रकमेची बिले व आज आलेली वाढीव बिले यांची झेरॉक्स काढून आमच्याकडे जमा करावी. वाढीव रकमेची बिले कमी होत नाहीत, तोपर्यंत नागरिकांनी घरपट्टी भरु नये, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.

कोरोनामुळे गेल्या दहा महिन्यांपासून शहरातील व्यापारी व सर्वसामान्य नागरिक रोजगाराविना घरी बसून आहेत. दुकाने व रोजगार बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशातच फलटण नगर परिषदेने वाढीव घरपट्टीची बिले देऊन नागरिकांवर अन्याय केला आहे. ही वाढीव घरपट्टी कमी करावी, अन्यथा आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.