शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तांब्याच्या तारांवर माहीतगार व्यक्तीचाच डोळा

By admin | Updated: August 24, 2014 00:32 IST

लाखोंचा फटका : कंपन्यांनी काढला चोरीचा विमा

प्रगती जाधव-पाटील ल्ल साताराडोंगरमाथ्यावरील पवनचक्क्यांमध्ये असणाऱ्या तांब्याची तार सुमारे दहा लाख किमतीची असते. यामुळे आता चोरट्यांनी आपले लक्ष्य पवनचक्की पठाराकडे वळविले आहे. एका पवनचक्कीला असणारी तार चोरली तर लाखोंची कमाई होते. या वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पवनचक्की कंपन्यांनी चोरीचा विमा काढला आहे. ही चोरी करताना पवनचक्की तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान आवश्यक आहे. म्हणूनच पवनचक्कीविषयी सखोल माहिती असलेला व्यक्तीच ही चोरी करू शकतो.सुरक्षारक्षक नसणे, पवनचक्की बंद असणे आणि पोलिसांचा राउंड कोणत्या वेळेत नसतो याचा अभ्यास करून ही टोळी सक्रिय होते. पठारावर विखुरलेल्या पवनचक्क्यांच्या जाळ्यात कुठे काय चालले आहे, याची माहिती घेण्यासाठी फारसं कोणी धजावत नाही. याचा फायदा घेत चोरट्यांनी पवनचक्कीला लक्ष्य केले आहे.सोने-चांदी दुकान किंवा घरफोडी करण्यापेक्षा ही चोरी सुरक्षित आणि अधिक फायदा करून देणारी असल्याने चोरटे याकडे आकर्षित झाले आहेत. वाढत्या चोऱ्यांचे सत्र लक्षात घेता पवनचक्की कंपनीने आता पवनचक्कीचा चोरीचा विमाही करून घेतला आहे. त्यामुळे पवनचक्कीचा कोणताही भाग चोरीस गेला तर त्याची भरपाई संबंधित कंपनीला मिळू शकेल. पाते आणि मशीन यांना जोडणारी वायर दोनशे मीटर लांबीची आणि सुमारे पाचशे ते सातशे किलो वजनाची असते. (प्रतिनिधी)सुरक्षा रामभरोसे..!एकेका पठारावर शेकडो पवनचक्क्या उभ्या असतात. शंभर एकरावर पसरलेल्या या पवनचक्क्यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र सुरक्षारक्षक नसतो. त्यामुळे पवनचक्कींची सुरक्षा रामभरोसे अशीच असते. त्यामुळे एका टोकावर चोरी होत असेल तर त्याचा सुगावा दुसऱ्या टोकाला असणाऱ्या सुरक्षारक्षकाला नसतो. काही कंपन्यांनी एकेका सुरक्षारक्षकाला वीस-वीस पवनचक्कींची जबाबदारी दिली आहे. पण, रात्रीच्या वेळी आठ-दहा जणांच्या टोळीपुढे एकटा माणूस पुरा पडणार नाही, म्हणून सुरक्षारक्षकच चोरी होताना उघड्या डोळ्याने पाहत असतो.