शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीत जनता हीच तर खरे राजे...

By admin | Updated: January 13, 2017 22:33 IST

उदयनराजे भोसले : सोनगाव येथील मेळाव्यात स्पष्टोक्ती

शेंद्रे : ‘लोकशाही व्यवस्थेत आपला प्रतिनिधी ठरविण्याचे सर्वाधिकार जनतेला आहेत. लोकशाही प्रणालीमध्ये मतदार जनता हीच खरी राजा आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत निवडणुकीसाठी योग्य उमेदवारालाच संधी दिली जाईल,’ असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुक्यातील शेंद्रे गटाचा कार्यकर्ता मेळावा सोनगाव कार्यालयात झाला. यावेळी ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, ‘जनतेमुळे आम्ही आहोत. आमच्यामुळे जनता नाही, या गोष्टींचा विसर लोकप्रतिनिधींना पडता कामा नये. तसेच जनतेनेही लोकप्रतिनिधींकडून हक्काने कामे करून घेतली पाहिजेत. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.’ यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, सदस्य संदीप शिंदे, सदस्या वनिता पोतेकर, माजी उपसभापती सूर्यकांत पडवळ, सुनील सावंत, अ‍ॅड. अंकुशराव जाधव, पांडुरंग नावडकर, मोहनराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सांबरवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद भणगे, रवी जांभळे, प्रतिभा भणगे यांनी खासदार उदयनराजे भोसले गटात जाहीर प्रवेश केला. तसेच यावेळी सुवर्णा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालकांचा खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी कारी या गावातील काही कार्यकर्त्यांनी खासदार गटात प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे, सुनील काटकर, सूर्यकांत पडवळ, वनिता पोतेकर, धनराज जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अ‍ॅड. अंकुशराव जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सुनील काटकर यांनी आभार मांडले. यावेळी शेंद्रे गटातील सर्व गावांतील कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)