शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

पवारांनी केली म्हणे पाऊस पाण्यावर चर्चा

By admin | Updated: July 7, 2015 22:26 IST

विश्रामगृहात काहीकाळच थांबले : कऱ्हाडच्या विरंगुळ्यातही रमले कृष्णा काठच्या हवामानाचाही घेतला अंदाज

प्रमोद सुकरे -कऱ्हाड --राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी खासगी दौऱ्यानिमित्त कऱ्हाडात अर्धा दिवस थांबले. शासकीय विश्रामगृहावर त्यांनी मोजक्याच व्यक्तींबरोबर पाऊस पाण्यावर चर्चा केली म्हणे. तर आमदार बाळासाहेब पाटील यांच्या घरी प्रितीभोजन घेऊन ते पुढच्या दौऱ्याला निघून गेले; पण पवारसाहेब नेमक्या कोणत्या पाऊस पाण्यावर बोलले. अन् प्रितीभोजन करताना त्यांनी संबंधितांना कोणत्या सूचना दिल्या, याबाबत उत्सुकता आहे. शरद पवार व पत्नी प्रतिभाताई पवार यांच्या गाड्यांचा ताफा मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पोहोचला. खासगी दौरा असल्याने मोजकेच शिलेदार विश्रामगृहावर स्वागताला हजर होते. आमदार बाळासाहेब पाटील, राजेश पाटील वाठारकर, देवराज पाटील, अरूण जाधव, माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे, नंदकुमार बटाणे यांच्याबरोबर चहा पित सुमारे १५ मिनिटे चर्चा केली. तेथून बाहेर पडताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला; पण ‘सध्या काही विषय अन् वातावरण नाही,’ असं म्हणत ते गाडीत बसून निघून गेले. मग चर्चेसाठी आत असणाऱ्या स्थानिक नेत्यांकडे चौकशी केली असता, पवारांनी पाऊस पाण्यावर चर्चा केल्याचे सांगण्यात आले. पावसाने अजूनही ओढ दिली तर धरणातल्या पाण्याचे नियोजन कसे करावे लागेल, असं बरंच काही; पण पवारसाहेब केवळ एवढचं बोलले असतील, यावर कोणाचा विश्वास बसू शकतो का?चर्चेदरम्यान पवारांनी आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडून ‘कृष्णा’काठच्या राजकीय हवामानाचीही माहिती घेतली. खरंतर कृष्णेच्या निवडणुकीत काय अन् कसे घडले, हे पवारांना माहित नाही असं शक्यच नाही. तरीही मग पावसाने ओढ दिली असली तरी ‘कृष्णे’च्या निवडणुकीत ‘पाऊस’ कसा पडला अन् सभासदांनी कोणा कोणाला कसे ‘पाणी’ पाजले, इथंपर्यंत सारी चर्चा झाली बरं. विरंगुळ्यात जुन्या आठवणींना उजाळाशरद पवारांनी प्रतिभातार्इंसोबत दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विरंगुळा या बंगल्याला भेट दिली. या स्मारकात यशवंतरावांच्या जुन्या आठवणी फोटो रूपाने मांडल्या आहेत. ते फोटो उभयता न्याहळत असताना एका फोटोसमोर त्यांचे पाय थबकले. यशवंतराव, वेणूताई अन् विठामाता या तिघांचा एकत्रित असणाऱ्या फोटोखाली ‘धन्य झाली माऊली’ असे लिहिलेले होते. तेव्हा पवारांनी प्रतिभातार्इंना सांगितले, ‘यशवंतराव जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा आईला भेटायला आले. आईला आपला मुलगा कोणीतरी मोठा झालाय, हे माहित होते; पण नेमका काय झालाय हे माहित नव्हते. तेव्हा भेटीदरम्यान यशवंतरावांना आई म्हणाली तू मोठा झालास म्हणजे मामलेदारापेक्षा मोठा झालास की काय,’ अशा अनेक आठवणी सांगत ते अर्धातास विरंगुळ्यात रमले. बाळासाहेबांघरी प्रितिभोजनकऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी पवार दाम्पत्याने प्रितिभोजन घेतले. शरद पवार, प्रतिभाताई पाटील, हसन मुश्रीफ अन् बाळासाहेब पाटील यांनी जेवताना अनेक विषयावर चर्चा केल्याचे समजते. या चर्चेदरम्यान थोरल्या पवारांनी पुढील राजकीय वाटचाली संदर्भात बाळासाहेबांना काही पे्रमाच्या सूचनाही दिल्याचे समजते. त्या सूचनांचे होऊ घातलेल्या बाजार समिती निवडणुकीत पालन होताना दिसेलच.अविनाश मोहितेंनी घेतली पवारांची भेटयशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीतील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र मोहितेंनी पवारांच्या हातात एक पत्र दिले. अन् त्या पत्रावरील माहिती थोरले पवार बराच वेळ न्याहळत होते; पण त्या पत्रात काय लिहलं होतं हे त्या दोघांनाच माहित. नुकत्याच झालेल्या कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जातेय. अविनाश मोहिते थोरल्या पवारांना भेटण्यासाठी आले अन् दहा पंधरा मिनिटात भेटून निघून गेले; पण त्यानंतर बाळासाहेब पाटलांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांच्यात अविनाश मोहितेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा बराच वेळ सुरू होती. विश्रामगृहातील चर्चेदरम्यान आमदार बाळासाहेब पाटील यांनी शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली असल्याचे कानावर घातले. त्याबाबत काय काय तयारी चालवलीय, याची माहिती त्यांच्या कानावर घातली. पवारांनी ती शांतपणे ऐकून घेतली एवढेच. शरद पवार व प्रतिभातार्इंनी वेणूताई चव्हाण मारकालाही आवर्जून भेट दिली. या स्मारकात यशवंतराव व वेणूताई या दोघांनी वापरलेल्या वस्तूंचे जतन करून ठेवले आहे. त्याचीही पाहणी बराचवेळ केली.