शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पाटणमधील उपविभागीय कार्यालय ‘नामधारी’!

By admin | Updated: March 10, 2016 23:51 IST

दोन्हींचा कार्यभार कऱ्हाडवर : पुन्हा ये रे माझ्या मागल्या; अधिकारी दीर्घ रजेवर

पाटण : लोकसंख्येने आणि महसुली गावांमुळे मोठा तालुका म्हणून पाटणची ओळख. त्यातच दुर्गम, डोंगराळ, पवनचक्की प्रकल्प आणि कोयना धरण ही तालुक्याची आभूषणे. कोयना, मोरगिरी, ढेबेवाडी, पाटण, मल्हारपेठ, चाफळ, मारुल हवेली, तारळे अशा विभागांमध्ये विखुरलेल्या तालुक्यात उपविभागीय कार्यालये असावीत. लोकांना कऱ्हाडला हेलपाटे घालावे लागू नयेत म्हणून शासनाने पाटणला सोय केली. त्यासाठी अधिकारी धाडले; पण या दोन्ही कार्यालयांचे प्रमुख सतत रजेवर किंवा बदलीच्या प्रयत्नात असल्यामुळे मध्यंतरी प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस कार्यालये प्रमुख अधिकाऱ्याविना नामधारी बनली आहेत. अधिकारी रजेवर गेल्यामुळे या दोन्ही कार्यालयांचा कार्यभार नेहमीप्रमाणे कऱ्हाडवर आहे.पाटण तालुक्यात २४१ गावे आणि ४४८ वाड्या-वस्त्या आहेत. गावांना महसुली सजा आणि मंडळांची संख्याही मोठी आहे. कोयना, ढेबेवाडी, पाटण येथे स्वतंत्र पोलीस ठाणी तर मल्हारपेठ, चाफळ, तारळे येथे पोलीस दूरक्षेत्रे आहेत. कोयना धरण सुरक्षितता आणि पवनचक्की आंदोलने, मारामाऱ्या आणि अपघात यासारख्या बाबींवर सातत्याने लक्ष ठेवावे लागते. त्यासाठी उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी ही पदे पाटण तालुक्यासाठी महत्त्वाची आहेत. मात्र अधिकाऱ्यांना करमेना अशी गत झाली आहे. सध्या दोन्ही अधिकारी वैद्यकीय रजेवर असतील मात्र यापूर्वीचा आढावा घेतल्यास उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकारी यांना पाटणचे हवामान मानवेना म्हणून की, काय सातत्याने अधिकारी रजेवर गेल्याचे रजिस्टरवरून दिसून येईल.(प्रतिनिधी)लोकांना कऱ्हाडला हेलपाटे घालावे लागतात..पाटणला उपविभागीय कार्यालये असली तरी त्यांचे प्रमुख किंवा कार्यभार कऱ्हाडच्या अधिकाऱ्यांकडे असल्यामुळे लोकांना तातडीचे दाखले परवाने किंवा पत्रासाठी कऱ्हाडला जावे लागत आहे. मग पाटणला कार्यालये असून काय कामाची? सहीसाठी कऱ्हाडला जावेच लागत आहे.महत्त्वाचे अधिकारीच रजेवर असतील तर पाटणच्या कार्यालयांचा काय उपयोग लोकांना हेलपाटे घालावे लागत आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी पाठपुरावा करावा व गैरसोय टाळावी.- महेंद्र तोडकर, पाटण