शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेविना दहावीची पोरं पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:29 IST

सातारा : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. सातारा जिल्ह्याचा निकाल ९९.९२ टक्के ...

सातारा : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. सातारा जिल्ह्याचा निकाल ९९.९२ टक्के लागला असून, विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाआधारे गुण देण्यात आले. वर्ग न भरता, परीक्षा न देता उत्तीर्ण होण्याचा बहुमान प्रथमच दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळविला; परंतु शिक्षण मंडळाची वेबसाईट बंद पडल्याने विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता आला नाही. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजण पडले.

राज्य शिक्षण मंडळामार्फत दि. २९ एप्रिल ते २३ मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारित जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना दि. २३ जून ते ३ जुलै अशी मुदत देण्यात आली होती.

शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्याचा प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवला. नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन याच्याआधारे विषयनिहाय निकालासाठी गुणदान करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना दहावीचे अंतिम गुण देऊन निकाल जाहीर करण्यात आला.

सातारा जिल्ह्यातील दहावीच्या ४० हजार १६६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. ४० हजार १६५ विद्यार्थ्यांना मूल्यमापनाच्या आधारित गुण देण्यात आले. यापैकी ४० हजार १३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ९९.९२ टक्के लागला आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी इंटरनेट कॅफेत निकालाची प्रिंट काढण्यासाठी गर्दी केली. अनेकांनी राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या संकेतस्थळावर मोबाईलच्या माध्यमातून निकाल पाहण्याचा प्रयत्न केला; परंतु निकालाचे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता आला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत संकेतस्थळ सुरू झाले नव्हते. निकाल म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये एकप्रकारची हुरहूर असायची. भीती व आनंदही असायचा. यंदा असे चित्र पाहायला मिळाले नाही. यंदा ना वर्ग भरले ना दहावीची परीक्षा झाली. पास होण्याची खात्री असल्याने विद्यार्थ्यांनी घरूनच आनंद साजरा केला.

(चौकट)

कोल्हापूर विभागात सातारा दुसरा

कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.९२ टक्के लागला आहे. यामध्ये सांगली ९९.९४, सातारा ९९.९२, तर कोल्हापूर ९९.९० टक्के गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानी आहे.

(चौकट)

सातारा जिल्ह्याचा लेखाजोखा

* माध्यमिक शाळा ७२६

----------

* नियमित विद्यार्थी

नोंदणी ४०१६६

मूल्यांकनप्राप्त विद्यार्थी ४०१६५

उत्तीर्ण विद्यार्थी ४०१३४

उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.९२

------------

* पुन:प्रविष्ट विद्यार्थी (रिपिटर)

नोंदणी १५०१

मूल्यांकनप्राप्त विद्यार्थी १५०१

उत्तीर्ण विद्यार्थी १४०४

उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.५३