शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या सहभागातून परिवर्तन शक्य

By admin | Updated: July 30, 2014 23:41 IST

राणी बंग यांचे उद््गार : गडचिरोली जिल्ह्यातील अनुभव ऐकून सातारकर भारावले

सातारा : मागास आदिवासी स्त्री-पुरुषांचे सहकार्य, आरोग्य सुधारणांना जनतेने दिलेली साथ, विविध आरोग्य योजनांतला सहभाग, यामुळेच गडचिरोली जिल्ह्यात समग्र आरोग्य क्रांती आणि व्यसनमुक्तीची महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी झाली आणि या प्रकल्पाची नोंद संयुक्त राष्ट्रसंघानेही घेतली. सामान्यांनी मनावर घेतले तर अवघड कामेही सोपी होतात, असे विचार ज्येष्ठ समाजसेविका, ‘शोध’ संस्थेच्या संचालिका डॉ. राणी बंग यांनी व्यक्त केले.सातारा जिल्हा स्त्री-आरोग्य आणि प्रसूतीशास्त्र तंत्र संघटनेच्यावतीने ‘विजयगाथा गडचिरोलीची’ या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा यांच्या आई मनोरमा आणि वडील रसिकलाल शहा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत बोलताना डॉ. राणी बंग यांनी गडचिरोली जिल्ह्यात क्रांती घडविणाऱ्या आरोग्य सुधारणांचा आढावा घेतला.त्या म्हणाल्या, ‘तीस वर्षांपूर्वी मी आणि डॉ. अभय बंग यांनी गडचिरोलीत रुग्णालय सुरू केले, तेव्हा प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागला. आदिवासी महिला, पुरुष आणि बालकांच्या समस्यांचा अभ्यास करून आम्ही त्यावर उपाययोजना करताना त्यांच्या मानसिकतेचाही गांभीर्याने अभ्यास केला. साक्षरतेचे अत्यल्प प्रमाण, बालविवाह, व्यसनाधीनता, कुपोषण अशा अनेक समस्यांवर मात करताना आदिवासी स्त्री-पुरुषांचेच साह्य मिळाले. आदिवासी समाजात सुईणीचे काम करणाऱ्या महिलेला आमच्या ‘शोध’ संस्थेने प्रसुतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकवले. गावागावांत पुरुषांना आरोग्यदूत नेमले. अंधश्रध्दा आणि रूढी-परंपरांपासून त्यांची सुटका व्हावी, यासाठी प्रयत्न केले.’ (प्रतिनिधी)